भगवंताच्या स्मृतींत प्रपंच करावा

20 Apr 2021 19:06:17

ss_3  H x W: 0
दुःखाचे मूळ कारणे। स्मरणांतून गेला रघुनंदन।। सर्व दुःखाचे मूळ। भगवंतापासून झालाे दूर।। रामावाचून प्रपंचात नाही सुख। कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख।। काेळशाने हात काळा झाला। त्याने दुःखी कष्टी झाला। ज्याचा जाे धर्म ताे त्याने पाळला। आपण मात्र नाही ओळखला। तैसा प्रपंच दुःखाचा झाला Ÿ। भगवंतावाचून वाया गेला।। जगातील ऐश्वर्य मानाची प्राप्ति। रामरायाविण समाधानाला न देती।। जे जे वैभत जगती। ते ते आले हाती। वाया सर्व जाते। हाती न येता रघुपती।। परमात्त्याचे विस्मरण। हेच बीज जाणावे मूळ कारण।। काळजी चिंता अहंकार। भीती तळमळ ार। हा झाला त्याचाच विस्तार।। तात्पर्यं, कडू बी पेरले। त्याचे गाेड फळ नाही आले।। काळजी आणि भीतीŸ। भगवंताच्या विस्मृतीत जन्मती।। म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी। परमात्म्याला दूरच करतील दाेन्ही।। व्यवहार, सद्वासना, सदाचरण। लाैकिक, संतती, संपत्ती, शास्त्राचे मनन। सर्व काही रामाविण वाटे शून्य।। संतति, संपत्ती, लाैकिकाची प्रात्ती। सर्व वैभव जरी आले हाती। तरी रामविण आहे फजिती।। प्रपंची ठेवता दक्षता। न विसंबे रघुनाथा। ताेच प्रपंची सुखी जाणा।। प्रपंच करावा सर्वांनी जपून। पण रामाचे स्मरण राखून।। सर्वस्वी व्हावे भगवंताचे। मी- माझे साेडाेनि साचे।। ‘मी कर्ता नव्हे’ जाणून करी कर्म। त्याला बाधेना कलीचा मार्ग।। दुष्ट अभिम ानाला न पडावे बळी। त्याचा मालक हाेईल कली। कली जेथे शिरला। त्याने राम दूर केला।। भगवंताचे स्मरण सांभाळून। काेणताही करावा व्यवसाय जपून। हेच प्रापंचिकास मुख्य साधन।। कर्ता मी नव्हे, कर्ता राम । ही मनात जाणून खूण। करावा व्यवहार जतन।। रामापरते हित। मानी त्याचा हाेई घात।। जाेवर ‘कर्ता मी’ हे ध्यानी। ताेवर मन न लागले राघवचरणी।। मीपणा टाकावा, अभिमान साेडावा। सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बाळगावा।। ज्याने केले सर्वच रामास अर्पण। तेथे मीपणास नाही ठाव ठिकाण।। पापाचे न व्हावे आपण धनी। कर्ता राम जाणून मनी।। रामसेवेपरते हितŸ। सत्य सत्य नाही या जगात।। म्हणून रामास व्हावे अनन्य शरणŸ। दुःख दूर व्हावयास मुख्य साधनŸ।। मनाने हाेऊन जावे भगवंताचे। ज्याने खास केले सार्थक जन्माचे।। म्हणून त्याचे भाग्य थाेर जाणा। ज्याने जाेडला रामराणा।। ज्याने देह केला रामास अर्पण। धन्य धन्य त्याचे जीवन।। म्हणून भगवंताचे हाेऊन राहणे। याहून दुजे काही न करणे।।  
Powered By Sangraha 9.0