नवी मुंबईत रुग्णांसाठी पाच हजार खाटांचे नियाेजन

    02-Apr-2021
Total Views |
महापालिका प्रशासनाची सज्जता : आठवडाभरात सुरू करणार काळजी केंद्र
 
4_1  H x W: 0 x
 
नवी मुंबई, 1 एप्रिल (आ.प्र.) : काेराेनाच्या वाढत्या रुग्णांमुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आराेग्य व्यवस्था खुली करण्याचे नियाेजन केले असून, आठवडाभरात सर्व प्रकारच्या आणखी पाच हजार खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. निर्यात भवन खुले करण्यात आले असून, कामगार रुग्णालयातही काळजी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रहेजा गृहसंकुलात 1 हजार, तर इंडिया बुल येथे 2 हजार खाटांचे काळजी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.नवी मुंबईत 24 मार्चपासून तुर्भे येथील राधास्वामी सत्संग आश्रमातील 411 क्षमतेचे काेराेना समर्पित आराेग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे.त्याप्रमाणेच सेक्टर 19 तुर्भेमध्ये निर्यात भवनातील 517 खाटांच्या क्षमतेचे आराेग्य केंद्रही कार्यान्वित करण्यात आले आहे. या दाेन्ही ठिकाणी प्राणवायू खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाेबतच काेणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नसणाऱ्या अथवा साैम्य लक्षणे असणाऱ्या बाधितांसाठी काेराेना काळजी केंद्रे पुन्हा कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्यात वाशीतील कामगार रुग्णालय, वाशी रेल्वे स्थानकासमाेरील दाेनशे खाटांच्या क्षमतेचे काळजी केंद्र सुरू करण्यात आले आहे. वाशीतील सिडकाे प्रदर्शनी केंद्र, तसेच सानपाडा येथील एमजीएम रुग्णालयात आधीपासूनच सेवा सुरू करण्यात आली आहे.शहरातील या सुविधांशिवाय आणखी काेराेना काळजी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. रहेजा येथे एक हजार खाटा, तर इंडिया बुल येथेही 2 हजार खाटांची केंद्रे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. याचबराेबर वारकरी भवन, वाशी सेक्टर 14 समाजमंदिर, जानकीबाई मढवी सभागृह, लेवा पाटीदार समाज अशा विविध ठिकाणी बंद केलेली काळजी केंद्रे पुन्हा सुरू हाेणार करम्यात येणार आहेत, असे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.