काेकणातील हापूसच्या दरात 100 रुपयांनी घसरण

    17-Apr-2021
Total Views |
नवी मुंबईच्या बाजारपेठेत परराज्यांतूनही वाढली आंब्याची आवक; निर्यातीचे प्रमाण नगण्य
 
 t_1  H x W: 0
 
नवी मुंबई, 16 एप्रिल (आ.प्र.) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पाडव्याच्या पूर्वसंध्येला काेकणातून आंब्याच्या 25 हजार पेट्यांची आवक झाली. आधीच हापूसची निर्यात कमी आहे, त्यामुळे स्थानिक बाजारात विक्रीसाठी हा आंबा उपलब्ध आहे.त्यातच बाजारात परराज्यांतून आणि इतर ठिकाणांहून येणाऱ्या आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे काेकणातील हापूसच्या दरात घसरण झाली आहे.एप्रिलपासून हापूसच्या मुख्य हंगामाला सुरुवात हाेते. या वेळी बाजारात माेठ्या प्रमाणात हापूस पाहायला मिळताे आणि निर्यातही हाेताे.मात्र, यंदा ही स्थिती नाही. बदलत्या वातावरणाचा फटका, वारंवार आलेल्या वादळी पावसाने हापूसचे झालेले नुकसान आणि आत्ताही अतिउष्णतेने फळ लवकर तयार हाेऊन झाडावरून गळू लागले आहे. जास्त उष्णता लागल्याने काही ठिकाणी आंब्याला काळे डागही पडण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे आंबा उत्पादक पुन्हा अडचणीत आला आहे.पाडव्याच्या पूर्वसंध्येला बाजारात हापूसच्या 25 हजार पेट्यांची आवक झाली आहे. त्यातच निर्यात थंडावल्याने स्थानिक बाजारात हा आंबा विकला जात आहे. परराज्यांतूनही बाजारात 20 हजार पेट्या दाखल झाल्या आहेत.त्यात कर्नाटक आंब्याची आवक माेठी आहे. त्यामुळे काेकणातील हापूसच्या दरात डझनामागे 100 ते 200 रुपयांची घसरण झाल्याची माहिती फळ बाजाराचे संचालक संजय पानसरे यांनी दिली.काेकणातील हापूसच्या पाच ते नऊ डझनाच्या पेटीसाठी दाेन हजारांपासून साडेचार हजारांचा दर मिळत आहे.
आणखी काही दिवस बाजारात हीच परिस्थिती राहणार असून, 20 एप्रिलनंतर काेकणातील हापूसची आवक वाढण्याची शक्यता आहे.