रखरखीत वाळवंटी दुबई हिरवाईने नटणार

    17-Apr-2021
Total Views |

b_1  H x W: 0 x
 
दुबई, 16 एप्रिल (वि.प्र.) : रखरखीत वाळवंटात वसलेल्या दुबईचा निम्मा भाग लवकरच झाडांमुळे हिरवागार हाेणार आहे. जगभरातील खरेदी शाैकिनांचे आवडते ठिकाण असलेले हे शहर वाळवंटी आहे.दुबईचे हे रूप बदलून ते हिरवेगार करण्याची याेजना तेथील सरकारने आखली असून, त्यासाठी ‘दुबई अर्बन मास्टर प्लॅन 20140’ची घाेषणा करण्यात आली आहे. देशाचा साठ टक्के भाग यातून हिरवाईने नटविला जाईल. दुबईचे शेख माेहम्मद बिन राशिद अल मक्तुम यांनी ही याेजना आखली आहे. राहणे आणि कामासाठी दुबईला जगातील सर्वाेत्तम शहर करण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी व्यक्त केली असून, त्यासाठी ही याेजना आखण्यात आली आहे.वाळवंटात असलेल्या दुबईच्या आठ टक्के भागातही 2008 पर्यंत हिरवाईचे आच्छादन नव्हते. पण, सरकारच्या प्रयत्नांमुळे 2020 पर्यंत 35 टक्के भागात हिरवाई निर्माण करण्यात आली. पण संपूर्ण दुबईचा विचार केला, तर हे आच्छादन फक्त वीस टक्के आहे.दुबईतील आर्थिक उलाढालीची पाच केंद्रे असतील. त्यात सध्या तीन कार्यन्वित असून, लवकरच दाेन केंद्रे सुरू केल जातील. सामाजिक जीवनमान सुधारून त्याला निसर्गाची जाेड देणे हा नव्या याेजनेचा उद्देश आहे. दुबईतील सार्वजनिक उद्यानांची संख्या दुप्पट केली जाईल.2040 पर्यंत दुबईची लाेकसंख्या 58 लाखांवर पाेहाेचण्याचा अंदाज असून, त्यासाठी हा मास्टर प्लॅन बनविला गेला आहे. आमिरातीच्या साठ टक्के भागात हिरवळीचे आच्छादन निर्माण केले जाणार असून, त्यात शहरी आणि ग्रामीण भागांचा समावेश असेल. पायी चालणारे आणि सायकली वापरणारे यांना साेईचे ठरणारे ‘ग्रीन काॅरिडाॅर’ यात तयार केले जाणार आहेत. सागरी किनाऱ्यांकडेही विशेष लक्ष दिले जाणार आहे.