हिंजवडी-शिवाजीनगर मेट्राे कारशेडचा प्रश्न मार्गी

    16-Apr-2021
Total Views |
माणमधील संपादित जागेचा ताबा जिल्हा प्रशासनाकडून महामट्राेकडे सुपूर्द
 
vgf_1  H x W: 0
 
पुणे, 15 एप्रिल (आ.प्र.) : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्राे प्रकल्पाच्या माणमधील कारशेडसाठी संपादित 60150 चाै.मी. क्षेत्राचा ताबा जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भूसंपादन अधिकारी तथा मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी घेऊन पीएमआरडीए व महामेट्राेच्या उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.पीएमआरडीएकडून सार्वजनिक- खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहेया प्रकल्पासाठी टाटा व सिमेन्स या कंपन्यांबराेबर करार झाला असून, करारानुसार पीएमआरडीएने या प्रकल्पासाठी आवश्यक जागा टाटा- सिमेन्सला ताब्यात देणे आवश्यक हाेते.माण येथील कारशेडच्या जागेबाबत विराेध असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया रखडली हाेती. आता हा अडथळा दूर झाल्याचे शिर्के यांनी सांगितले.
या मेट्राे प्रकल्पाच्या कारशेडची जागा 2004 मध्ये महाराष्ट्र राज्य औद्याेगिक विकास महामंडळासाठी (एमआयडीसी) आरक्षित करण्यात आली हाेती. हे आरक्षण बदलून ही जागा मेट्राे प्रकल्पासाठी देण्याची कागदाेपत्री प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे भूसंपादनातील अडचणी दूर झाल्या आहेत.या जागेबाबत प्रकल्पग्रस्तांना द्यावयाच्या परताव्याची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. या मेट्राे प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या जागांपैकी यशदा आणि वाडिया महाविद्यालयांच्या आवश्यक जागांचा ताबाही घेण्यात आला आहे.केंद्र सरकारच्या जागांसाठी पाठपुरावा सुरू आहे.डाॅ. देशमुख यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्र हाती घेतल्यापासून जिल्ह्यातील आणि शहरातील रखडलेल्या विकास प्रकल्पांना बूस्ट मिळाला आहे. रिंग राेड, मेट्राे, चांदणी चाैकातील उड्डाण पूल, नवले पूल परिसरातील रस्ता, या ठिकाणी असलेले भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल आहे.दर पंधरा दिवसातून जिल्हाधिकारी प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा घेत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहे.