आमिर खानच्या कन्येचे बाॅक्सिंग शिकताना जमले प्रेम

    16-Apr-2021
Total Views |
 
vgtg_1  H x W:
 
मुंबई, 15 एप्रिल (आ.प्र.) : अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान अभिनेत्री नसली तरी तिच्याबद्दल चर्चा मात्र जाेरदार रंगलेल्या असतात. रंगणाऱ्या चर्चांना कारण देखील तसेच आहे. इरा कायम तिच्या बाॅयफ्रेंडसाेबत फाेटाे, तर कधी व्हिडिओ पाेस्ट करत असते. इराने पाेस्ट केलेले व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत असतात. आतादेखील इराने बाॅयफ्रेंडसाेबत बाॅक्सिंगचा व्हिडिओ पाेस्ट केला आहे. सराव करत असतानाचा हा व्हिडिओ इराच्या चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.व्हिडिओमध्ये बाॅयफ्रेंड नूपुर हा इराला बाॅक्सिंगचे धडे देत आहे. त्याचप्रामाणे इरादेखील नूपुरने दिलेल्या सूचनांचे पालन करताना दिसत आहे. पण मध्ये काही हाेतं आणि इरा नूपुरला मिठी मारते. सांगायचं झालं तर इरा खानने फेब्रुवारी 2021राेजी बाॅयफ्रेंड नूपुर शिखारेसाेबत असलेल्या तिच्या नात्याला दुजाेरा दिला. दाेघे लव्हबर्ड्स कायम साेशल मीडियावर फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या फाेटाे आणि व्हिडिओंना चाहत्यांकडून प्रचंड प्रेमही मिळतं.नूपुर शिखारे हा आमिर खानचा फिटनेस काेच आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या रिपाेर्टनुसार लाॅकडाऊनच्या काळात जेव्हा इराने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा इरा आणि नूपुर यांच्यातील नातं फुललं. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र पसरू लागली.