कपिल शर्मा प्रत्येक एपिसाेडसाठी 50 लाख रुपये घेणार

    14-Apr-2021
Total Views |
‘दी कपिल शर्मा शाे’ मे महिन्यापासून पुन्हा सुरू हाेणार
 
x_1  H x W: 0 x
 
नवी दिल्ली, 13 एप्रिल (वि.प्र.) : काॅमेडियन कपिल शर्मा याची कमाई हा नेहमीच चर्चेचा विषय असताे. याआधी ताे प्रत्येक एपिसाेडमागे 35 लाख रुपये घेत हाेता, मात्र आता त्याने त्याची प्राइस वाढविली असून, ताे येत्या सिझनसाठी 50 लाख रुपये प्रत्येक एपिसाेडसाठी घेणार आहे.बाॅलिवूडलाइफ.काॅम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सध्या स्थगित असलेला ‘दी कपिल शर्मा शाे’ मे महिन्यापासून पुन्हा सुरू हाेणार आहे. हा शाे देशातील सर्वाधिक लाेकप्रिय काॅमेडी शाे असून, पहिल्या सीझनपासूनच त्याला प्रेक्षकांचा भरघाेस प्रतिसाद लाभला.कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर, किकू शारदा, सुमाेना चक्रवर्ती, भारती सिंग यांची ताेलामाेलाची साथ या शाेमध्ये कपिल शर्माला लाभते. परीक्षक म्हणून अर्चना पुरणसिंग रंग भरते. यातील कृष्णा अभिषेक हा उल्लेखनीय कलाकार प्रत्येक एपिसाेडमागाे 12 लाख रुपये घेताे.चंदू चहावाल्याची भूमिका रंगतदारपणे करणारा चंदन प्रभाकरची प्रतिएपिसाेड कमाई 7 लाख रुपये आहे. किकू शारदा या गुणवान कलाकाराला प्रतिएपिसाेड 5 लाख रुपये मिळतात. सुमाेना चक्रवर्तीला प्रतिएपिसाेड 7 लाख रुपये, तर भारती सिंगला 12 लाख रुपये मिळतात. परीक्षक म्हणून काम करणाऱ्या अर्चना पुरणसिंगची प्रतिएपिसाेड कमाई 10 लाख रुपये आहे.