तीव्र वेदना हाेत असल्यास पेशंटला पेन किलर देणे धाेकादायक

    13-Apr-2021
Total Views |
ब्रिटनमधील आराेग्य सेवेने डॉक्टरांना दिलेला सल्ला
 
xf_1  H x W: 0
 
संध्यानंद.काॅम तीव्र वेदनांमध्ये दिलासा देण्यासाठी पेशंटला पेन किलर देणे धाेकादायक ठरू शकते. ब्रिटनच्या राष्ट्रीय आराेग्य सेवेने (एनएसएस) गाइडलाइन जारी करून डाॅ्नटरांना सल्ला दिला आहे की, क्राेनिक पेन म्हणजे जुनाट वेदना असल्याच्या स्थितीत पेन किलर औषधे पेशंट्सना लिहून देऊ नयेत.एनएसएसचे म्हणणे आहे की, पेन किलरच्या रूपात वापरली जाणारी पॅरासिटामाेल किंवा आयब्यूप्राेफेन औषधे वेदनांपासून मु्नती देत असतील किंवा नाही, पण ही औषधे शरीराला खूप नुकसान पाेहाेचवू शकतात.एनएसएसने आपल्या गाइडलाइन्समध्ये सांगितले आहे की, या गाेष्टीचे पुरेसे पुरावे आहेत की, ही औषधे शरीराला खूप जास्त नुकसान पाेहाेचवू शकतात. त्यामध्ये सांगितले आहे की, या गाेष्टीचे काेणते पुरावे नाहीत की, पेन किलर घेतल्याने वेदनांवर काय परिणाम हाेताे? एनएसएसने सल्ला दिला आहे की, क्राेनिक पेनच्या स्थितीत पेन किलर घेण्यापेक्षा चांगले आहे नियमित व्यायाम करावा. जर वेदना जास्त असतील तर नियमित रूपाने फिजियाेथेरपिस्कटच्या देखरेखीखाली काही दिवसांपर्यंत फिजियाे करा.