गृह विलगीकरणातील रुग्णांच्या दाेन्ही हातांवर शिक्के

12 Apr 2021 18:52:40
ठाणे महापालिकेची कार्यवाही सुरू : काेराेना प्रतिबंधासाठी कडक उपाय
 
uj_1  H x W: 0
 
ठाणे, 11 एप्रिल (आ.प्र.) : काेराेनाचा वाढता संसर्ग राेखण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबाजवणी करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन ठाेस पावले उचलत असून, खासगी रुग्णालयांवर नियंत्रणाबराेबरच गृह विलगीकरणातील रुग्णांच्या दाेन्ही हातांवर शिक्के मारण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच, रेमडेसिवीर इंजेक्शनचा दवाखान्याने खरेदी केलेला साठा, वापरलेले इंजेक्शन व त्याच्या रिकाम्या वाईल्सचा ताळेबंद पडताळून रेमडेसिवीरचा गैरवापर हाेत नसल्याची दक्षता घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शिंदे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन संसर्ग राेखण्यासाठी तातडीने उपाययाेजना करण्याचे निर्देश दिले हाेते. शहरात ज्या नागरिकांना काेराेनाची लक्षणे नाहीत; परंतु ते घरीच उपचार घेत आहेत, अशा रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, गृह विलगीकरणातील रुग्णांच्या दाेन्ही हातांवर शिक्के मारण्यात येत आहेत. परिमंडळाच्या अधिनस्त असलेल्या खासगी दवाखान्यातील अत्यवस्थ, तसेच सहव्याधी असलेल्या रुग्णांबाबत दैनिक माहिती गाेळा करून, रुग्णाचे नाव, वय, रुग्णास असलेल्या आजाराविषयीची माहिती, रुग्णाचा फाेन क्रमांक, दवाखान्याचे नाव आदी माहितीसह प्रभाग समितीनिहाय दैनिक अहवालही राेज मुख्यालयाकडे सादर करून त्या रुग्णाच्या उपचाराबाबतही माहिती घेण्यात येत आहे.दरम्यान, खासगी दवाखान्यांत वापरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत सहायक आयुक्तांमार्फत प्रभाग समितीतील दवाखान्यास भेट देऊन रेमडेसिवीर इंजेक्शनचा दवाखान्याने खरेदी केलेला साठा, वापरलेले इंजेक्शन व त्याच्या रिकाम्या वाईल्सचा ताळेबंद पडताळून रेमडेसिवीरचा गैरवापर हाेत नसल्याची दक्षता घेण्यात येणार आहे.त्या पार्श्वभूमीवर परिमंडळ उपायुक्तांमार्फत दैनंदिन नियंत्रण ठेवण्यात येत असून, त्याचा अहवाल त्याच दिवशी मुख्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, मास्क वापराबाबत कडक कार्यवाही करून त्याचाही दैनंदिन अहवाल मुख्यालयास सादर करण्याच्या सूचना प्रभाग समित्यांना देण्यात आल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0