पाऱ्याचे शाेषण करून वनस्पती करतात मदत : निष्कर्ष

    12-Apr-2021
Total Views |

x_1  H x W: 0 x
 
माॅस्काे, 11 एप्रिल (वि.प्र.) : विषारी पारा असलेल्या घातक वायूचे शाेषण करून प्रदूषण कमी करण्याचे माेलाचे काम वनस्पती करतात.लाॅवेलमधील मॅसेच्युसेट्स विद्यापीठाने केलेल्या संशाेधनातून ही माहिती मिळाली आहे. शाेषून घेतलेल्या या वायूचा घातकपणा कमी करून वनस्पती जमिनीत मिसळून टाकत असल्याचेही दिसले.हवेतील कार्बन डायऑ्नसाइड हा वायू शाेषण्याचे काम वनस्पती करतात हे सर्वांना माहिती आहे. त्यात आता पारामिश्रित वायूही वनस्पती शाेषत असल्याची नवी माहिती मिळाली आहे. काेळशाचे ज्वलन, खाणकाम आणि अन्य औद्याेगिक-नैसर्गिक प्रक्रियांमधून दरवर्षी शेकडाे टन पारा वातावरणातील हवेत मिसळताे. पण, वनस्पती ही घातक हवा शाेषून आपल्यावर उपकारच करत असतात.झाडेवनस्पतींची पाने पिकल्यावर ती गळून पडतात किंवा कालांतराने ती वनस्पती मरण पावते.अशावेळी या वनस्पतीमधील पाऱ्याचा अंश जमिनीत मिसळताे आणि पुढे ताे पाण्याच्या प्रवाहांमध्ये जाऊन जीव आणि जलसृष्टीवर त्याचा परिणाम हाेताे. अशा पाण्यातील मासे खाल्ल्यास मानवी शरीरातही पारा काही प्रमाणात जात असल्याचे ‘अर्थ अँड एन्व्हाॅर्न्मेंट’ या नियतकालिकातील लेखात नमूद करण्यात आले आहे. शरीरात दीर्घकाळ पारा जात राहिल्यास मेंदू आणि हृदयविकारांचा धाेका असल्याची माहिती मॅसेच्युसेट्स विद्यापीठातील प्राध्यापक डॅनियल ओब्रिस्ट यांनी दिली. मानवी शरीरातील पारा किती असताना सुरक्षित असते याचा काेणताही निकष नसल्याचे जागतिक आराेग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. मूत्रपिंड, बाेलण्यात अडथळा येणे, विस्मृती, दिसण्यास त्रास हाेणे आदी विकार पाऱ्यामुळे हाेत असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.वनस्पती पाऱ्याचे शाेषण किती करतात हे पाहण्यासाठी संशाेधकांनी जगभरातील चारशे ठिकाणांवरून वनस्पतींचे नमुने गाेळा केले, तेव्हा त्यांच्यात 88 टक्के पारा सापडला.