पालकाला येणार मांसासारखी चव

    10-Apr-2021
Total Views |

x_1  H x W: 0 x
 
बाेस्टन, 9 एप्रिल (वि.प्र.) : आपल्या नेहमीच्या आहारातील पालक या भाजीला मांसाची चव आली तर? कल्पना थाेडी विचित्र वाटत असली, तरी ‘बाेस्टन काॅलेज इंजिनिअर’ने हा प्रयाेग केला असून, मांसाच्या पेशी पालकावर वाढविण्याचा त्यांचा प्रयाेग यशस्वी झाला आहे.या प्रकाराला त्यांनी ‘कल्चर्ड मीट’ असे नाव दिले आहे. या प्रयाेगाची माहिती ‘फूड बायाेसायन्स’ या ऑनलाइन जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली असून, या प्रयाेगामुळे पेशीय कृषी क्षेत्राचा विकास हाेण्याची, तसेच अन्नाची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत हाेईल. त्याचप्रमाणे यासाठी खर्च कमी येत असल्याचाही फायदा हाेईल, असा संशाेधकांचा दावा आहे.