स्मार्टफाेन कॅमेरा सांगेल नाडी आणि श्वासाचा वेग

    10-Apr-2021
Total Views |
 
ब,_1  H x W: 0
 
वाॅशिंग्टन, 9 एप्रिल (वि.प्र.) : स्मार्टफाेन अथवा काॅम्प्युटरवरील कॅमेऱ्याच्या मदतीमुळे रुग्णाच्या नाडीचा (पल्स) आणि श्वासाेच्छ्वासाचा वेग लवकरच माेजता येईल.काेव्हिड-19 च्या काळात आराेग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा रुग्णांबराेबर कमीत कमी थेट संपर्क टाळण्यासाठी सध्या टेलिहेल्थवर भर दिला जात असल्याने हे नवे तंत्र डाॅ्नटरांना उपयुक्त ठरणार आहे. रुग्णाच्या चेहऱ्यावर प्रकाशझाेत टाकल्यावर त्याचा परिणाम नाडी आणि श्वासाच्या वेगावर कसा हाेताे हे या तंत्रात पाहिले जाते. वाॅशिंग्टन विद्यापीठाने ते विकसित केले आहे. प्रकाशझाेत पडल्यावर रक्तप्रवाहात बदल हाेऊन त्याचा परिणाम नाडी आणि श्वासाच्या वेगावर हाेताे. डिसेंबर महिन्यात झालेल्या ‘न्यूरल इन्फाॅर्मे शन प्राेसेसिंग सिस्टिम’ या परिषदेत हे तंत्र प्रथम दाखविण्यात आले हाेते.त्यात आणखी सुधारणा केल्या जात आहेत.प्रकाशाची स्थिती, त्वचेचा रंग, चेहऱ्याची ठेवण आदी घटक यात महत्त्वाचे ठरतील, अशी माहिती शिन लिऊ या संशाेधकाने दिली. यासंदर्भात अधिक संशाेधन सुरू असून, लवकरच ते पूर्ण हाेईल आणि त्यानंतर या तंत्राचा वापर श्नय हाेईल, असे त्यांनी सांगितले.