आदेशांचे पालन करणारा राेबाे कुत्रा चीनमधील कंपनीकडून विकसित

10 Apr 2021 13:01:42

ds_1  H x W: 0
 
बीजिंग, 9 एप्रिल (वि.प्र.) : चीनमधील एका कंपनीने अल्फा ब्रँड खाली एक राेबाे कुत्रा तयार केला आहे.कुत्रा आणि तंत्रज्ञान याची चीनमध्ये तुफान क्रेझ आहे. याच क्रेझमुळे आता दिलेल्या आदेशांचे पालन करणारा राेबाे कुत्रा विकसित झाला आहे. हा हाय टेक हाऊंड सेन्सर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करताे.त्याला फिरायलाही घेऊन जाता येते. वायलान कंपनीने हा कुत्रा विकसित केला असून, ताे हुबेहूब श्वानासारखा दिसताे. तासाला 15 किलाेमीटर वेगाने हा राेबाे कुत्रा धावू शकताे. धातूच्या चार पायांमुळे हा कुत्रा अधिक स्थिर राहताे. दाेन लाख रुपये किंमत असूनही कंपनीने 1800 अल्फा कुत्र्यांची विक्री केली आहे.
 
Powered By Sangraha 9.0