सायप्रसच्या नववधूचा पाेशाख ठरला विश्वविक्रमी

10 Apr 2021 13:03:05
मारिया पारस्केव्हाचा ‘वेडिंग व्हेल’ 6962 मीटर लांबीचा; ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड्स’ने घेतली नाेंद
 
क्ष._1  H x W:
 
संध्यानंद.काॅम विवाह ही आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना असल्यामुळे ताे कसा व्हावा याबाबत प्रत्येक तरुणीची कल्पना वेगळी असते. विवाहप्रसंगी आपला पाेशाख इतरांपेक्षा वेगळा असण्याबाबत मुली फार जागरुक असतात. सायप्रसमधील मारिया पारास्केव्हा या तरुणीनेही असा विचार केला आणि आपले वेगळेपण सिद्ध केले.पाशात्त्य देशांतील विवाह समारंभांत पायघाेळ पांढरा पाेशाख असताे आणि जाळीदार आच्छादनाशिवाय (व्हेल) ताे पूर्ण हाेत नाही. तब्बल 6962.6 मीटर लांबीचा असा पाेशाख परिधान करून मारियाने वेगळेपण दाखवून दिले, साेबतच जागतिक विक्रमसुद्धा केला.देशाेदेशी विवाहाच्या पद्धती वेगळ्या असल्या, तरी उत्सुकता आणि काही वेगळेपणा करण्याची प्रवृत्ती सारखीच असते. पाश्चात्त्य देशांमध्ये नववधू सहसा पांढऱ्या पायघाेळ पाेशाखात असते आणि त्यावरील आच्छादनाशिवाय पाेशाख पूर्ण हाेत नाही. हा पाेशाख पायघाेळ असल्यामुळे ताे सावरण्यासाठी मदतनीसही असतात. सायप्रसमधील मारिया पारास्केव्हा या नववधूने मात्र पाेशाखात विक्रमच केला. तिचा पाेशाख हाेता 6962.6 मीटर लांबीचा. ताे तयार करण्यासाठी तीस जणांना सहा तास मेहनत करावी लागली. या पाेशाखाची नाेंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड्सने’ घेतली असून, त्याची क्लिप इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ‘माझ्या विवाहात सर्वांत लांब पाेशाख वापरून जागतिक विक्रम करण्याचे माझे लहानपणापासून स्वप्न हाेते,’ असे मारिया सांगते.या पाेशाखाची क्लिप व्हायरल झाल्यावर नेटिझन्स सक्रिय झाले. काहींनी मारियाची प्रशंसा केली, तर काहींनी हा प्रकार म्हणजे कापड वाया घालविणे असल्याची शेरेबाजी केली. ‘या लांबलचक पाेशाखाप्रमाणे मारियाला दीर्घ वैवाहिक आयुष्य लाभावे,’ अशा शुभेच्छाही काहींनी दिल्या आहेत.
 
Powered By Sangraha 9.0