राज्यात आता दस्त नाेंदणी करता येणार ऑनलाइन

    10-Apr-2021
Total Views |
दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी निर्णय; डेटा एंट्री करणे अनिवाय
 
x_1  H x W: 0 x
 
मुंबई, 9 एप्रिल (आ.प्र.) : राज्यातील काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी दस्त नाेंदणी विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व दस्त नाेंदणीच्या साेयीसाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने या सेवा-सुविधांचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचा वापर करून दस्त नाेंदणीस सहकार्य करावे, असे आवाहन शासनाने केले आहे.नागरिकांनी या विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्त नाेंदणीसाठी पीडीईद्वारे डेटा एंट्री करणे अनिवार्य आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबवण्यात येत आहेत. पीडीई डेटा एंट्री करून दस्त नाेंदणीसाठी या विभागाच्या वेबसाइटवर शडींशळिप या प्रणालीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली साेयीची वेळ ऑनलाइन आगाऊ बुक करून किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर, समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य करण्यात आले आहे.काेणत्याही परिस्थितीत आगाऊ वेळ आरक्षित केली नसल्यास दस्त नाेंदणी हाेणार नाही.नागरिकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाबाहेरच करावे. प्रत्येक व्यक्तीने सह्यांसाठी स्वत:चे पेन आणणे, एकच पेन एकमेकांत सह्यांसाठी वापरू नये. आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर राहावे, मास्क लावल्याशिवाय काेणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. विभागाच्या वेबसाइटवर लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स दस्ताची कार्यालयातील नाेंदणी (फिजिकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात येत आहे.मुंबई, ठाणे, पुणे व इतर ठिकाणी सकाळ व दुपार, अशा दाेन सत्रांत कार्यालये सुरू आहेत. त्याऐवजी अशा सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात म्हणजेच 9.45 ते 6.15 या वेळेतच राहील, जी दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नाेंदणीसाठी शनिवार व रविवारी सुरू हाेती, त्याचे कामकाज शनिवार व रविवारी बंद करण्यात येत असून, त्या कार्यालयांचे कामकाज साेमवार ते शुक्रवार नियमित सुरू राहील, असे मुंबई विभागाच्या नाेंदणी उपमहानिरीक्षकांनी कळवले आहे.