जैविक इंधनांच्या प्रदूषणामुळे भारतात वर्षाला 25 लाख मृत्यू

    10-Apr-2021
Total Views |
 
व._1  H x W: 0
 
नवी दिल्ली, 9 एप्रिल (वि.प्र.) : जीवाश्मांपासून तयार करण्यात येणाऱ्या इंधनामुळे भारतात दरवर्षी 25 लाख जणांचा मृत्यू हाेताे. या इंधनामुळे हाेणाऱ्या प्रदूषणामुळे हे घडते.भारतासह अनेक देशांमध्ये प्रामुख्याने काेळसा आणि डिझेल ही जैविक इंधने वापरली जातात. त्यांच्यामुळे 2018मध्ये जगभरात सुमारे 80 लाख मृत्यू झाले आणि त्यात भारताचा वाटा 30.7 टक्के हाेता, असा हार्वर्ड विद्यापीठ, बर्मिंगहॅम विद्यापीठ आणि लंडन महाविद्यालय यांच्या संयुक्त अभ्यासाचा निष्कर्ष आहे. प्रदूषणामुळे हाेणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी ‘पीएम-2.5’ या अतिसूक्ष्म घातक कणांवर आधारित असते. मात्र, जैविक इंधनांमुळे किती मृत्यू हाेऊ शकतात याची आकडेवारी उपलब्ध नव्हती. अंतराळात साेडलेल्या कृत्रिम उपग्रहांच्या मदतीमुळे ही माहिती मिळाली आहे.या संशाेधनासाठी शास्त्रज्ञांनी ‘नॅशनल स्पेस अँड एराेनाॅटीक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (नासा) या संस्थेच्या ‘ग्लाेबल माॅडेलिंग अँड अ‍ॅसिमिलिशेन ऑफिस’मधील ‘गाेडर्ड अर्थ ऑब्झर्व्हे शन सिस्टिम’ (जीइओएस) या माॅडेलची मदत घेतली. हवेत असलेल्या ‘पीएम-2.5’ कणांचा स्राेत शाेधणे त्यामुळे श्नय हाेते. जैविक इंधनांमुळे 2018मध्ये जगभरात 80 लाख लाेकांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी या माॅडेलच्या आधारे काढला आहे. जैविक इंधनांमुळे हाेणाऱ्या मृत्यूंची जगभरातील टक्केवारी 2012मध्ये 21.5 हाेती आणि 2018मध्ये ती 18 टक्क्यांवर आली. जैविक इंधनांच्या मानकांबाबत कडक नियमावलीमुळे हे प्रमाण कमी झाल्याचे सांगण्यात आले.