‘एआय’च्या मदतीने जुन्या फाेटाेंमध्ये बदल करता येणे शक्य

    06-Mar-2021
Total Views |
‘डीप नाॅस्टाल्जिया’मुळे आजाेबांचा हसरा चेहरा शक्य
 
फ._1  H x W: 0
 
सान फ्रान्सिस्काे, 5 मार्च (वि.प्र.) : घरात असलेल्या जुन्या फाेटाेंमध्ये काही बदल करण्याची तुम्हाला इच्छा असेल, तर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तुमच्या मदतीला सज्ज आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून बदललेले फाेटाे आता साेशल मीडियावर झळकायला लागले आहेत.‘डीप नाॅस्टाल्जिया’ या नावाने ही सेवा सुरू झाली असून, चेहऱ्यामध्ये हवे तसे बदल करता येण्याची सुविधा हे तिचे वैशिष्ट्य आहे. एक उदाहरण घेऊ. तुमच्या आजाेबांच्या जुन्या फाेटाेमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणून ते तुमच्याकडे बघत असल्याचे दाखवावयाचे असेल तर ते आता शक्य आहे. स्थिर फाेटाेंमध्ये (स्टिल) हवे तसे बदल आता शक्य आहेत.मानवी वंशावळीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘मायहेरिटेज’ या कंपनीने ‘डीपनाॅस्टाल्जिया’ ही सेवा सुरू केली असून, त्यात स्थिर फाेटाेचे रूपांतर हलत्या फाेटाेमध्ये करता येण्याबराेबरच हवे ते बदलसुद्धा करता येत असल्याचे वृत्त ‘व्हर्ज’ या नियतकालिकाने दिले आहे. जुन्या, ऐतिहासिक फाेटाेंचे रूपांतर उच्च क्षमतेच्या, खऱ्या वाटणाऱ्या व्हिडिओ फुटेजमध्ये करण्याचे तंत्रज्ञान या कंपनीने विकसित केल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.‘डीप नाॅस्टाल्जिया’मध्ये कंपनीने विकसित केलेले अनेक ड्रायव्हर (गती देणारी यंत्रणा) विकसित केले असून, प्रत्येक ड्रायव्हरमध्ये व्हिडिओचे तंत्रज्ञान आहे आणि फाेटाेची क्रमवार मांडणी करून हावभाव तयार करण्याचे तंत्रज्ञान त्यात आहे. फाेटाेचा व्हिडिओ या तंत्रज्ञानातून तयार केला जाताे.एकप्रकारे अ‍ॅनिमेशनचे काम या तंत्रात केले जाते. त्यामुळे फाेटाेतील व्यक्ती हसत असल्याचे अथवा डाेळे मिचकावत असल्याचे दिसते. आवडत्या नातलगांच्या फाेटाेंमध्ये आपल्याला हवे ते हावभाव निर्माण करता येणे या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे.