सर्वांत जुनी कला काेणती?

    06-Mar-2021
Total Views |
 
व/_1  H x W: 0
 
चित्रकला ही माणसाची सर्वांत जुनी कला आहे, असे मानायला हरकत नाही. मानवाला जेव्हा बाेलताही येत नव्हते, तेव्हा त्याचे हात गुहेच्या भिंतीवरून चित्रे काढीत असत. कमीत कमी 50 हजार वर्षांइतकी जुनी चित्रे उत्तर स्पेनमधील व दक्षिण फ्रान्समधील डाेंगरातील गुहांत आढळली आहेत. त्यापैकी सर्वांत प्रसिद्ध चित्रे स्पेनमधील अल्टीमीराच्या गुहेत 1879 साली सापडली यातील बहुतेक चित्रे शिकारीच्या प्राण्यांची असून ती प्रथम दगडात काेरून व मग त्यात पिवळा आणि लाल रंग भरून चितारलेली आहेत. रेषा व रंग यांचे आश्चर्यकारक ज्ञान आणि सूक्ष्म निरीक्षणश्नती यामुळे ती कलेचा उत्कृष्ट नमुना मानली जातात.