गर्भावस्थेत ‘ड’ जीवनसत्त्व आवश्यक

    06-Mar-2021
Total Views |
 
D_1  H x W: 0 x
 
हेलसिंकी, 5 मार्च (वि.प्र.) : नुकत्याच केलेल्या अध्ययनाच्या निष्कर्षानुसार गर्भवती महिलेच्या शरीरात ‘ड’ जीवनसत्त्व कमी प्रमाणात असेल, तर जन्मणाऱ्या बाळाला एडी-एचडी (हायपर अ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर) हाेण्याचा धाेका जास्त असताे. ज्या लाेकांना एडी-एचडी हा आजार हाेताे ते लाेक काेणत्याही विषयावर मन एकाग्र करू शकत नाहीत व त्यांचे त्यांच्या वागण्यावरही नियंत्रण राहत नाही, असा निष्कर्ष िफनलँडच्या युनिव्हर्सिटी ऑफ तुर्कूच्या शास्त्रज्ञांनी काढला आहे. या शास्त्रज्ञांनी 1067 मुलांचे अध्ययन केले.