प्राणिक्लेश प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्यास कठाेर कारवाई

    06-Mar-2021
Total Views |

v_1  H x W: 0 x
 
पुणे, 5 मार्च (आ.प्र) : प्राणिक्लेश प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्याचे आढळल्यास कठाेर कारवाई करण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिले. प्राणिक्लेश प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात सर्वत्र प्रभावी अंमलबजावणी हाेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले.जिल्हास्तरीय प्राणिक्लेश प्रतिबंधक समितीची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्या वेळी ते बाेलत हाेते. समितीचे सदस्य हरीश खाेमणे, संदीप नवले, सुरेश रास्ते, नेहा पंचामिया, माेहन मते, सचिन माेकाटे, शंभू पवार, पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. शीतलकुमार मुकणे, पाेलीस उप अधीक्षक अमृत देशमुख, वनसंरक्षक आशुताेष शेंडगे, पुणे तसेच पिंपरीचिंचवड महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी, पाेलीस निरीक्षक विजया करांडे, देहूराेड कॅन्टाेन्मेंटचे एम.ए.सय्यद आदी उपस्थित हाेते.शहरी व ग्रामीण स्तरावर लाेकसहभाग घेत प्राणिक्लेश प्रतिबंधक कायद्याचा भंग हाेऊ नये यासाठी वेळाेवेळी तपासणी व कारवाई करणे आवश्यक सांगून प्राणिक्लेश प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्याचे आढळल्यास कठाेर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी उपक्रम राबविण्यात यावेत, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, पाेलीस, पशुसंवर्धन तसेच प्राणिक्लेश प्रतिबंधक समिती या सर्वांनी एकत्रित समन्वयाने शहरी तसेच ग्रामीण भागात वन्यप्राणी आल्यास याबाबत मार्गदर्शिका तयार करावी.शहरी तसेच ग्रामीण भागातील स्थानिक नागरिकांचा सहभाग घ्यावा तसेच याबाबत प्रशिक्षण घ्यावे.प्राणी लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्राणिक्लेश प्रतिबंध कायद्यानुसार अधिकाधिक कारवाया व्हाव्यात जेणेकरून गैरप्रकार करणाऱ्यांना आळा बसेल व जागृतीही हाेईल.