मानवनिर्मित कचऱ्याची दरवर्षी निसर्गाकडूनच हाेते स्वच्छता

06 Mar 2021 14:47:35

V_1  H x W: 0 x
 
लंडन, 5 मार्च (वि.प्र.) : मानवनिर्मित चार काेटी 17 लाख टन कचऱ्याची (मल-मूत्र व अन्य) स्वच्छता निसर्गच प्रतिवर्षी करत असल्याचे एका नव्या अभ्यासातून समाेर आले आहे.खर्चाच्या दृष्टीने विचार केला, तर या सेवेचे मूल्य हाेईल तब्बल 4.4 अब्ज डाॅलर! याबाबत ‘वन अर्थ’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, शहरांमधून निर्माण हाेणारी वीस लाख घनमीटरपेक्षा जास्त घाण निसर्ग दरवर्षी स्वच्छ करताे व त्यात प्रामुख्याने विष्ठेचा समावेश असताे.ही घाण हळूहळू मातीत मिसळत असली, तरी ती भूगर्भातील पाण्यात जाण्यापूर्वी तिची स्वच्छता झालेली असते.ब्रिटनमधील क्रेनफिल्ड विद्यापीठातील अ‍ॅलिसन पार्कर यांनी केलेल्या संशाेधनातून ही माहिती मिळाली आहे.स्वच्छ पर्यावरणाची जबाबदारी निसर्ग आपणहून पार पाडत असल्याचे यातून सिद्ध हाेत असल्याचे त्यांनी सांगितले.स्वच्छतेच्या पायाभूत सुविधा तयार करणे ही आपली जबाबदारी असूनही तिकडे फार लक्ष दिले जात नाही. निसर्गाकडून याबाबत खूप शिकण्यासारखे असल्याचे मत त्यांनी व्य्नत केले. दूषित अथवा खराब पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरण्यासारखे करण्याची गरज असते.शहरांत तसे शुद्धिकरण प्रकल्पही उभारले जातात. आराेग्यासाठी ते आवश्यक आहेत; पण जगातील 25 टक्के लाेकसंख्येला स्वच्छतेच्या पायाभूत सुविधासुद्धा उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती आहे.अद्याप 14 टक्के लाेक उघड्यावर प्रातर्विधी करतात आणि ही घाण थेट जमिनीत मिसळते, असे अ‍ॅलिसन पार्कर नमूद केले. मानवनिर्मित कचऱ्यात आराेग्याला घातक असलेल्या काही वस्तूसुद्धा असतात. पण, नैसर्गिक पाणथळी आणि खारफुटीची जंगले त्यावर उपयुक्त ठरू शकतात. या अभ्यासासाठी जगभरातील 48 शहरांतील आठ काेटी वीस लाख लाेकांबराेबर बाेलून काही माहिती घेण्यात आल्याचे ‘वन अर्थ’ने म्हटले आहे.
 
Powered By Sangraha 9.0