अशिक्षित कुटुंबातील गंधम बनलाय जिल्हाधिकारी

    06-Mar-2021
Total Views |

C_1  H x W: 0 x 
 
कर्नूल, 5 मार्च (वि.प्र.) : कुटुंबातील लाेकांनी पिढ्यान् पिढ्या शाळेचे ताेंडही पाहिलेले नाही, अशा कुटुंबात जन्म झालेल्या विद्यमान पिढीच्या गंधम चंद्रुड यांनी शिक्षण घेतले. रेल्वेमध्ये टीसीची नाेकरी केली आणि आज गंधम चंद्रुड आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्हाधिकारी आहे. तिकिट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर हा त्याच्या आयुष्याचा प्रवास विद्यमान पिढीसाठी विशेषत: गरीब मुलामुलींसाठी प्रेरणास्त्राेत आहे.2010 कॅडरचे आयएएस अधिकारी गंधम चंद्रुड यांचा जन्म अशा कुटुंबात झाला ज्या कुटुंबाने पिढ्यान् पिढ्या कधीही शाळेचे ताेंड पाहिलेले नाही. हे कुटुंब आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील काेटपाडु गावाचे आहे. शिक्षण घेणारी या कुटुंबाची ही पहिली पिढी ठरली आहे.सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर गंधम यांनी दक्षिण मध्य रेल्वेत तिकिट कलेक्टर म्हणून नाेकरी सुरू केली. त्यांचे आई-वडील शेतात मजुरी करीत असत.गंधम या पिढीतील पहिली सुशिक्षित व्यक्ती आहे.
यापूर्वी त्यांच्या परिवारातील काेणीही सरकारी नाेकरी केलेली नाही. 5 व्या इयत्तेपर्यंत त्यांचे शिक्षण गावातच झाले.त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण शेजारच्या गावातील माध्यमिक शाळेत झाले.दहावी उत्तीर्ण झाल्यावर रेल्वे रिक्रूटमेंट बाेर्डाची परीक्षा दिली. यानंतर 11 वी 12 वी शिकत असतानाच व्हाेकेशनल काेर्स उत्तीर्ण झाल्यावर सिकंदराबादमधील रेल्वे ज्युनियर काॅलेजमध्ये काेर्स केला व उत्तीर्ण झाल्यावर गंधमला टीसीची नाेकरी मिळाली. पण गंधमला आणखी शिकावे, अशी ओढ हाेती.