मूल झाल्यानंतर घटते महिलांची शैक्षणिक प्रगती

    05-Mar-2021
Total Views |
काेलाेरॅडाे विद्यापीठाच्या संशाेधनातील माहिती
 
g_1  H x W: 0 x
 
न्यूयाॅर्क, 4 मार्च (वि.प्र) : पालकत्वाच्या जबाबदारीसाठी पुरुषांनी मदत करण्याचे प्रमाण वाढले असले, तरी मूल झाल्यावर महिलांच्या शैक्षणिक प्रगतीत वीस टक्के घट हाेत असल्याचे बाेल्डर येथील काेलाेरॅडाे विद्यापीठातील संशाेधकांचे म्हणणे आहे. पालकत्वाची जबाबदारी प्रामुख्याने स्त्रियांची असल्याची पूर्वीची समजूत आता राहिलेली नाही. पुरुषही त्यात मदत करतात आणि त्यासाठी खास पालकत्व रजाही घेतात. पण तरीही मूल झाल्यावर महिलांच्या शैक्षणिक प्रगतीत वीस टक्के घट हाेते. ती प्रामुख्याने संशाेधन प्रबंध सादर करण्यात हाेत असल्याचे हे संशाेधन सांगते.‘अ‍ॅलिसन माॅर्गन’ या संस्थेच्या मदतीने हे संशाेधन करण्यात आले आहे. फॅकल्टी पाेझिशनवर असलेल्या महिलांसाठी पालकत्व रजा अत्यंत महत्त्वाची असली तरी 43 टक्के संस्थांमध्ये तशी तरतूद नसल्याचे या संशाेधनात आढळले. ‘पालकत्वातील लिंगाधारित भेदभावामुळे महिलांची उत्पादनक्षमता घटते आहे. नाेकरी निवडताना रजेबाबतचे धाेरण त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते आणि ते नसेल तर त्यांच्यापुढे फार पर्याय उरत नाहीत,’ असे संशाेधनाच्या अहवालात नमूद करण्यात आले असून, ‘सायन्स’ या नियतकालिकात ताे प्रसिद्ध झाला आहे. अमेरिका आणि कॅनडातील 450 विद्यापीठांचा अभ्यास या संशाेधनासाठी करण्यात आला हाेता.