आता न्यूझीलंडमध्ये वायरलेस वीजवितरण

05 Mar 2021 15:48:03

द._1  H x W: 0
 
ऑकलँड, 4 मार्च (वि.प्र.) : न्यूझीलंड आता जगात सर्वप्रथम वायरलेस वीज वितरण करणारा देश बनणार आहे. कारण आतापर्यंत वायरलेस वीज वितरण नुसती कल्पना हाेती. पण आता न्यूझीलंडची एक कंपनी अ‍ॅमराेड इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी पाॅवरकाे आणि टेस्ला कंपनीच्या मदतीने ही कल्पना साकार करणार आहे. मायक्राेवेव्हच्या अतिशय पातळ बीमच्या स्वरूपात घराेघर पाेहाेचणार आहे. येत्या काही महिन्यांत वायरलेस वीज पुरवठ्याची ट्रायल घेण्यात येणार आहे.अ‍ॅमराेड, पाॅवरकाे आणि टेस्ला ऑकलंडच्या उत्तर भागात एका साेलर फार्मपासून कित्येक किलाेमीटर दूर वस्त्यांमध्ये बीम एनर्जीच्या माध्यमातून घराेघर वीज पाेहाेचवण्याची तयारी सुरू केली. पाॅवर बीमिंग प्रक्रियेचा यापूर्वी मिलिटरीची कामे आणि स्पेस प्रयाेगापर्यंतच मर्यादित हाेता. आता जगात प्रथमच बीम एनर्जीद्वारे वायरलेस वीज पुरवठा हाेणार आहे. यापूर्वी अमेरिकन अंतराळ संशाेधन केंद्र नासाने असा प्रयत्न केला हाेता. परंतु त्यावेळी नासा 34.6 किलाेमीटर वीज फक्त 1.6 किमी पर्यंतच पाेहाेचविण्यात यशस्वी झाली हाेती. आता अ‍ॅमराेड कंपनीचे संस्थापक ग्रेग कुशनीर यांनीही सुरुवातीला आम्ही 1.8 कि.मी. पर्यंत वीज पाेहाेचवणार आहाेत व हळूहळू हे अंतर वाढविणार आहाेत. यामुळे दुर्गम भागात वीज पाेहाेचविण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागणार नाही. या संदर्भात अ‍ॅमराॅड कंपनी रिले आणि मेटामटेरियल्स अशा दाेन टेक्नाॅलाॅजीचे अध्ययन करीत आहे. यासाठी अगाेदरपासूनच क्लार्किंग उपकरणे लावली जात आहेत.आकाशातून वीज पुरवठा करणारी पद्धत जाेखमीची आहे. या बीम्स एक प्रकारच्या लेजर पडद्यावर कव्हर करण्यात येतील. त्यामुळे नागरिकांना काेणत्याही प्रकारचा धाेका निर्माण हाेणार नाही.
 
Powered By Sangraha 9.0