अंतराळात 2027 पर्यंत हाॅटेल सुरू हाेणार!

    05-Mar-2021
Total Views |
 
c_1  H x W: 0 x
 
न्यूयाॅर्क 4 मार्च (वि.प्र.): अंतराळात व्हाॅयेजर नावाच्या हाॅटेलचे बांधकाम सुरू हाेऊन हे हाॅटेल अंतराळ प्रवाशांसाठी 2027 मध्ये खुले हाेणार आहे. गेटवे फाउंडेशनने 2012 मध्ये अंतराळात व्हाॅयेजर स्पेस हाॅटेलची घाेषणा केली हाेती.ही कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी 2018 मध्ये ऑर्बिटल असेम्बली कार्पाेरेशन स्थापन करण्यात आले हाेते.या स्पेस हाॅटेलसाठी राेटेटिंग स्पेस स्टेशन पृथ्वीभाेवती फिरण्याचा वेग कमी जास्त करून कृत्रिम गुरुत्वाकर्षणाचे प्रमाण कमी जास्त करण्यासाठी नॅशनल स्पेस एजन्सीचे सहकार्य घेण्यात येणार आहे. याशिवाय पृथ्वीचे भ्रमण करणाऱ्या या फिरत्या स्पेस हाॅटेलमध्ये पर्यटकांनाही प्रवेश देण्याची याेजना तयार करण्यात येत आहे. यामुळे पर्यटन क्षेत्रात ‘स्पेसपर्यटन’ चे नवे युग सुरू हाेणार आहे.या स्पेस हाॅटेलमध्ये एकावेळी 400 लाेकांची व्यवस्था असेल. या हाॅटेलमध्ये रूम्स, वाईन बार, सिनेमा, रेस्टाॅरंट, लायब्ररी, काॅन्सर्ट व्हेन्यू, हेल्थ स्पा, व्यायामशाळा, आणि अंतराळातून पृथ्वी पाहण्यासाठी विशेष प्रकारचे ‘अर्थ व्ह्युईंग लाॅन’ तयार करण्यात येणार आहे.