फायदा किती हाेणार आहे हे पाहून मेंदू घेताे कामाबाबत निर्णय

    05-Mar-2021
Total Views |
ब्राऊन विद्यापीठातील नव्या संशाेधनाचा निष्कर्ष
 
फ,_1  H x W: 0
 
नवी दिल्ली, 4 मार्च (वि.प्र.) : कामातून आपल्याला काय आणि किती फायदा मिळणार आहे यावर त्यासाठी किती प्रयत्न करावयाचे हे आपला मेंदू ठरवीत असल्याचे एका नव्या संशाेधनातून स्पष्ट झाले आहे. ऱ्हाेड आयलंडवरील ब्राऊन विद्यापीठातील अमिताई शेनव यांनी याबाबत केलेल्या प्रयाेगाचा हा निष्कर्ष आहे.काेणतेही काम करताना मेंदूचे सहकार्य असतेच; पण या कामातून मिळणाऱ्या फायद्यावर त्यासाठी किती श्रम अथवा प्रयत्न करावयाचे याचा निर्णय आपण; म्हणजे मेंदू करत असल्याचे या संशाेधनात दिसून आले आहे. त्यासाठी टीव्ही बघत असलेल्या व्यक्तीचे उदाहरण शेनव देतात. कामाची आठवण येताक्षणी ती व्यक्ती टीव्ही बंद करते आणि काम सुरू करते. कारण, कामातून पैसे मिळण्याचा फायदा हा त्यामागील विचार असताे. म्हणजेच मिळणाऱ्या लाभाचा विचार मेंदूने केलेला असल्याने ती व्यक्ती टीव्ही पाहणे बंद करून काम सुरू करते. काम केले तर वेतनासह बाेनस मिळेल, पदाेन्नती हाेईल आणि कदाचित सध्यापेक्षा जास्त चांगल्या वेतनाचा जाॅब मिळेल एवढे विचार त्यामागे असू शकतात.पण, काम करूनही फायदा हाेणार नसल्याचा विचार त्या व्यक्तीने केला तर त्याला कामात रस उरत नाही. म्हणजेच ती व्यक्ती फक्त ते काम पूर्ण करेल एवढेच. चांगले करेलच असे नाही.या संदर्भात संशाेधकांनी काही जणांना एक काम देऊन त्याचा काय परिणाम हाेताे हे तपासले. केलेल्या कामाचे चांगले पारिताेषिक मिळेल असे सांगितलेल्या व्यक्तींनी उत्तम काम केले आणि पारिताेषिक फार नसल्याचे सांगितलेल्यांनी मात्र त्या कामासाठी फार श्रम घेतले नसल्याचे त्यात दिसले.याचाच अर्थ, काेणत्याही कामातून मिळणाऱ्या फायद्याचा विचार मेंदू करत असल्याचे स्पष्ट हाेते, असे शेनव यांनी नमूद केले.