2500 रुपयांचा कटाेरा आता 3 काेटी 60 लाखांना विकणार

    05-Mar-2021
Total Views |
 
fg_1  H x W: 0
 
नवी दिल्ली, 4 मार्च (वि.प्र.) : ज्याप्रमाणे अल्लाउद्दीनला रस्त्यावर गंजलेल्या स्थितीत जादूचा दिवा सापडला आणि त्याचे भाग्य उजळले. त्याचप्रमाणे भंगार म्हणून 2500 रु. खरेदी केलेला चिनी मातीचा कटाेरा एका लिलाव कंपनीचे भाग्य उजळणार आहे. कारण सिदबी नावाची ही लिलाव कंपनी हा कटाेरा 2500 रु. पेक्षा 14,300 पटीने जास्त किमतीला म्हणजे तब्बल 3 काेटी 60 लाख रु. ला विकणार आहे.याचे कारण असे की, हा कटाेरा 15व्या शतकातील चिनी राजघराण्याचा असल्याचे पुरातत्त्व खात्याने म्हटले आहे. त्यामुळे हा मामुली कटाेरा आता दुर्लभ अ‍ॅन्टीक बनला आहे. लिलाव कंपनी हा कटाेरा खरेदी करणाऱ्या व्य्नतीचे नाव जाहीर करणार नाही.