सूर्यपक्षी

05 Mar 2021 16:03:02

d_1  H x W: 0 x 
 
चिमुकला सूर्यपक्षी तुम्ही पाहिला आहे का? हा पक्षी चिऊताईहूनही लहान असताे.केवळ 10 सेंमी इतकाच.नराचे डाेके, छातीचा भाग हिरवा, नारिंगी, जांभळ्या रंगाचे मिश्रण असते, तर मागील भाग निळसर जांभळा, पाेटाखालचा भाग पिवळा असताे. तर मादीचा रंग वरून तपकिरी, खालून फिकट पिवळा आणि तिला काळे पंख असतात. जांभळा सूर्यपक्षी देखील खूपच सुरेख दिसताे. मादी एकटीच घरटे बांधण्याचे, अंडी उबविण्याचे काम करते. मात्र पिल्लांना खाऊ घालण्याचे काम नर-मादी मिळून करतात. चिमणीपेक्षा आकाराने लहान, अतिशय सुंदर आणि चमकदार दिसणारा सूर्यपक्षी विदर्भात सर्वत्र आढळताे. मादी पक्ष्याच्या पाेटाचा भाग फिकट पिवळसर, तर पाठ करड्या रंगाची असते.कीटक आणि काेळ्यासह, फुलांमधील मधुरस हे मुख्य खाद्य असल्याने, शहरी परिसरात जेथे फुलझाडांची लागवड आवडीने केली जाते, अशा परिसरात हा पक्षी आढळताे. फुलातला मधुरस शाेषून घेता यावा म्हणून याच्या जिभेची रचना एखाद्या नळीप्रमाणे असते. मुख्यत: मार्च महिन्यादरम्यान, झाडाच्या फांदीच्या टाेकाला, काेळ्याचे जाळे वापरून घरटे तयार करताे. हे घरटे सहज दिसत नाही. 2-3 राखी किंवा हिरवट रंगाचे व तपकिरी ठिपके असणारी अंडी घालतात
 
Powered By Sangraha 9.0