उंदराच्या आकाराचे दुर्मीळ हरीण

    05-Mar-2021
Total Views |
द._1  H x W: 0  
 
मलागा, 4 मार्च (वि.प्र.) : स्पेनमधील मलागा राज्यातील बायाेपार्क येथील फ्युओंगी ओला प्राणी संग्रहालयात उंदराच्या आकाराचा ‘जावा माऊस’ नावाचे हरीण लाेकांना लवकरच पाहता येणार आहे.माणसाने वड, पिंपळ यासारख्या अवाढव्य झाडांच्या बाेन्साई म्हणजे अगदी छाेट्या आकाराचे वृक्ष तयार केले आहेत. तर निसर्गाने प्राण्यांना बाेन्साई बनविणे सुरू केले असावे. कारण माकड, वाघ, सिंह यासारखे प्राणी मांजरीच्या आकाराचे पहायला मिळत आहेत. स्पेनमधील या प्राणी संग्रहालयातील हरीण ट्रॅग्युलस जवानिक्स प्रजातीच्या उंदराच्या आकाराचे आहेत. या हरीणाचे वजन फक्त 1 किलाे 8 ग्रॅम आहे. असे प्राणी आग्नेय आशियातील विषुववृत्तीय जंगलात आढळतात. युराेपमध्ये अशा बाेन्साई आकाराचे फक्त 43 हरिण आहेत.