महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल आज सादर हाेणार

    05-Mar-2021
Total Views |
ठाणे, 4 मार्च (आ.प्र.) : राज्याचा 2020-21चा आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी (5 मार्च) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात सादर करणार आहेत. हा अहवाल अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in VgoM https://mls.org.in,https:// www.maharashtra-gov.in,https:// www.finance.maharashtra.gov.या संकेतस्थळांवर उपलब्ध हाेणार आहे, अशी माहिती अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने दिली आहे.दरवर्षी राज्य विधान मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी एक दिवस आधी ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी’ हे प्रकाशन विधान मंडळाच्या दाेन्ही सभागृहात सादर केले जाते. या अधिवेशनात ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2020-21’ हे प्रकाशन दाेन्ही सभागृहांत शुक्रवारी सादर केले जाणार आहे. यंदा सर्व अर्थसंकल्पीय प्रकाशने डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे.