समाजमाध्यमांतून बनावट शासन निर्णय प्रसारित झाल्याचे स्पष्ट

    05-Mar-2021
Total Views |
 
मुंबई, 4 मार्च (आ.प्र.) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे, नांदेड, नागपूर आणि चंद्रपूर येथे अतिविशेषाेपचार रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रथम टप्प्यासाठी आवश्यक 888 पदांच्या निर्मितीबाबतचा 27 जानेवारीचा बनावट शासन निर्णय प्रसारित करण्यात आला आहे. त्या आधारे आराेग्यसेवक पदाची अंतिम निवड यादी याबाबतचा 18 ेब्रुवारीचा दुसरा बनावट शासन निर्णय प्रसारित करण्यात आला.समाजमाध्यमांत प्रसारित हाेणारे हे दाेन्ही शासन निर्णय बनावट असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.या बनावट शासन निर्णयात विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग दर्शवले असून, शासन निर्णय क्रमांकात वैसेवा-1 कार्यासनाचा उल्लेख आढळताे. मात्र, समाजमाध्यमांत प्रसारित हाेणारा शासन निर्णय राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील वैसेवा-1 कार्यासनाकडून निर्गमित करण्यात आला नसल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने स्पष्ट केले आहे. या बनावट शासन निर्णयामुळे अनेक इच्छुक उमेदवारांची फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने याबाबत स्पष्टीकरण केले आहे.