विद्यार्थ्यांसाठी गुगलने आणले 50 पेक्षा जास्त नवे फीचर्स

05 Mar 2021 15:44:16
 
फ/_1  H x W: 0
 
नवी दिल्ली, 4 मार्च (वि.प्र.) : गुगलने विद्यार्थ्यांसाठी 50 पेक्षा जास्त नवे फिचर्स आणले आहेत. हे फीचर्स विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर शिक्षकांसाठी सुद्धा लर्निंग एक्स्पिरियन्स देऊ शकतील.याशिवाय झी स्युट फॉर एज्युकेशन साेबतच गुगल क्लासरूम आणि गुगल मीट मध्येही अनेक बदल करण्याचीही घाेषणा केली आहे. आता गुगलच्या ‘टीच फ्रॉम एनीव्हेअर’ हब आता आठ भारतीय भाषेत उपलब्ध आहे. गुगल ‘क्लासरूम अ‍ॅन्ड्राइड अ‍ॅप’ ऑफलाइन करणार आहे.त्यामुळे विद्यार्थी आता विना इंटरनेट कनेक्शन सुद्धा काम करतानाच आपल्या असाइनमेंट रिव्ह्यू करू शकतील. ड्राइव्ह अटॅचमेंट उघडू शकतील व गुगल डाॅक्समध्ये असाइनमेंट्स सेव्ह करू शकतील. तर क्लासरूम अ‍ॅड ऑन्समुळे थर्ड पार्टी अ‍ॅडटेक टूल्स आणि कन्टेंट थेट क्लासरूम इंटरेसमध्ये इंटिग्रेड करू शकतील. उत्कृष्ट माेबाइल ग्रेडिंगमुळे क्लासरूम अँड्राइड अ‍ॅपमध्ये इन्स्ट्रक्टर्स स्टुडंटचे सबमिशन्स मध्येच स्वीच करू शकतील. असाइनमेंट पाहता ग्रेड अँड फिडबॅक सुद्धा देऊ शकतील.यामुळे आता हाेमवर्क शेअरिंग साेपी हाेईल. या अ‍ॅपमध्ये विद्यार्थी आपल्या हाेमवर्कचे फोटाे एका डाॅक्युमेंट मध्ये कंबाइन करून सबमिशन साेपे करण्यासाठी मदत करेल. याशिवाय वे इन इमेजेस प्रस्तुत करण्यापूर्वी क्राॅप, राेटेट आणि लाइट अ‍ॅडजस्ट करू शकतील. तसेच त्यांना प्लॅगिएरिज्मची ओळख हाेईल.यासाठी गुगल विद्यार्थ्यांना हिंदी सहित 15 भाषांमध्ये मूळ रिपाेर्ट्स समाविष्ट करण्याची सुविधा देईल
 
Powered By Sangraha 9.0