एकावेळी एकाच पिल्लाला वाढवतात गरुड

    05-Mar-2021
Total Views |

फ._1  H x W: 0  
 
पाैराणिक साहित्यात असं सांगितलंय की गरुड हे विष्णूचे वाहन आहे. गरुड हा कठीण परिस्थितीत जीवन जगण्याची क्षमता असणारा पक्षी आहे. गरुडाची मादी आकाराने नरापेक्षा माेठी असते. गरुडाची मादी एकावेळी दाेन अंडी देते पण एकावेळी एकच अंडे उबवते. दुसरे बाजूला ठेवते.उबवलेल्या अंड्यातून बाहेर आलेले पिल्लू खाऊपिऊ लागले की मगच दुसरे अंडे उबवते. पिल्लाचा जन्म झाल्यानंतर 2 ते 3 आठवडे ते त्याची काळजी घेतात.त्यानंतर पिल्लाला ते स्वतंत्रपणे उडायला मदतही करतात.एकदा बांधलेले घरटे गरुड वर्षानुवर्षे वापरताे. घरटे बांधण्याचे काम मादी गरुड करते. पाणीसाठा ज्या ठिकाणी असेल तेथे या पक्ष्याची घरटी असतात. लहानमाेठ्या काड्या, बांबूचे तुकडे, गवत, फांद्या, माती या साहित्याने ती आपले घरटे भ्नकम बांधते. काही घरटी 10 ते 20 वर्षही टिकतात. दरवेळी त्याच घरट्याला अधिक मजूबत करत जातात.गरुडाचे आयुष्य साधारणपणे 25 ते 45 वर्ष इतके असते. पसरलेल्या पंखाची लांबी साडेपाच ते आठ फूट असते.गरुडाचे पाय फिकट नारिंगी व चाेच पिवळी असते.अनेकदा आधी जन्माला आलेलं पिल्लू दुसऱ्या लहान पिल्लाचा जीवही घेते. छाेटे कासव, साप, मासाेळी, समुद्रपक्षी, इतर जलचर त्याचे खाद्य असते. काही वेळा इतर पक्ष्यांचे भक्ष्य गरुड उडता उडता पळवताे.त्याची चाेच बाकदार व तीक्ष्ण असते.गरुडाच्या डाे्नयाच्या तुलनेत त्याचे डाेळे फारच माेठे असतात. डाेळ्यांची बाहुली माेठी असते. गरुडांना एकाच वेळी समाेर व बाजूला पाहता येते त्यामुळे ताे अधिक दूरचे पाहू शकताे. त्याच्या डाेळ्यावरचे संरक्षक कवच सूर्याच्या किरणांपासून त्याच्या डाेळ्यांचे रक्षण करते. त्यामुळे समुद्र व नदीच्या पाण्यातील मासाेळी शाेधणे त्याला सहज शक्य हाेते.वेगवगळ्या ठिकाणी विविध प्रकारचे गरुड आढळतात. अमेरिका व कॅनडात बाल ईगल आढळतात.हा अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी आहे.पश्चिम आशियात इम्पिरिअल ही प्रजाती आढळते. फिलिपाइन्समध्ये आढळणारा गरुड जगातील माेठ्या गरुडांपैकी एक आहे. स्पेन, पाेर्तुगालमधून हिवाळ्यात गरुड पक्षी भारत, चीन व आफ्रिकेत स्थलांतरित हाेताना आढळतात.