रिक्षावर आर्किटेक्टने बनवले आलिशान हिंडते-फिरते घर

05 Mar 2021 16:04:22
लाेक घर तयार करण्यासाठी लाखाे रुपये खर्चही करतात. पण एका आर्किटेक्टने केवळ एक लाख रुपये खर्च करून हे चालते-फिरते आलिशान घर बनवले आहे. हे एक साधेसुधे घर नसून, तर हे एक ‘माेबाइल हाेम’ आहे.
 
fc_1  H x W: 0
 
उद्याेगपती आनंद महिंद्र नेहमीच उत्तमाेत्तम व्हिडीओ ट्विटरवर पाेस्ट करत असतात. त्यांच्या व्हिडीओंना माेठ्या प्रमाणात लाइक्स मिळतात आणि ते शेअरही केले जातात. त्यांनी नुकताच एका रिक्षाचा व्हिडीओ पाेस्ट केला आहे. ही साधीसुधी रिक्षा नाही, तर हे एक ‘माेबाइल हाेम’ आहे. हे घर एका आर्किटेक्टने तयार केले असून, अगदी लहान जागेत एक सुंदर घर कसे तयार हाेऊ शकते, त्याचे हे आदर्श उदाहरण आहे.अलीकडे मिलिमॅनिजमची माेठी क्रेझ आहे. याचा अर्थ कमीत कमी जागेत घर तयार करणे. जगभरात अशी घरे तयार केली जात आहेत. मात्र, हे रिक्षावरचे घर अत्यंत आगळेवेगळे आहे.लाेक घर तयार करण्यासाठी अनेक लाेक लाखाे रुपये खर्चही करतात. पण एका आर्किटेक्टने केवळ एक लाख रुपये खर्च करून हे चालते-फिरते आलिशान घर बनवले आहे. या घराची माहिती आनंद महिंद्र यांना समजली.तेव्हा त्यांनीदेखील या अनाेख्या घराचे काैतुक केले. त्यांनी साेशल मीडियावर या आर्किटेक्टची पाठ थाेपटली आहे.शिवाय महिंद्र पिकअप आणि बाेलेराे या गाड्यांनाही अशा पद्धतीच्या आलिशान घरात बदलण्याचे आमंत्रणही या आर्किटेक्टला दिले आहे.ही रिक्षा अरुण प्रभू यांची असून, ते चेन्नईतील राहणारे आहेत. रिक्षारूपी या घरात गरजेच्या सर्व सुविधा आहेत. घराची जागा माेठी असून, व्हेंटिलेशनचीही चांगली साेय आहे. या घरातही खिडक्या आणि दरवाजे बनवले असून, छतावर कपडे वाळवण्याची व्यवस्थाही केली आहे.अरुणच्या या घराचा फाेटाे ट्विटर अकाउंटवरून शेअर केल्यानंतर ताे अल्पावधीतच व्हायरल झाला. काहींनी अरुण प्रभू यांचा पत्ताही महिंद्रा यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे.
 
Powered By Sangraha 9.0