एलन मस्कची स्टारलिंक भारतात वेगवान इंटरनेट देणार

    05-Mar-2021
Total Views |

g_1  H x W: 0 x 
 
नवी दिल्ली, 4 मार्च (वि.प्र.) : आता भारतात रिलायन्स जिओ आणि अन्य टेलिकाॅम कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत टेस्ला या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनीचे सीईओ एलन मस्क आहेत. लवकरच भारतात एलन मस्क यांची दुसरी कंपनीstarlink इंटरनेट सेवा सुरू करणार आहे, त्यासाठी रजिस्ट्रेशनही सुरू झाले आहे. SpaceX Starlink इंटरनेटची सेवा कंट्राेल करते, SpaceX ही एक एअराेस्पेस कंपनी असून, मस्क यांनी 2002 मध्ये अंतराळात शाेध व सेवा देण्यासाठी डरिलशद ची स्थापना केली हाेती.ही कंपनी सॅटेलाइट्सद्वारे हाय-स्पीड इंटरनेट सेवा पुरवणार आहे. Starlink इंडियाची वेबसाइट भारतात इंटरनेट सेवा देण्यासाठी लाइव्ह झाली असून, बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.रिपाेर्ट्सनुसार, 2022 मध्ये भारतात स्टारलिंकची इंटरनेट सेवा सुरू हाेऊ शकते. पण, कनेक्शन घेण्यासाठी प्री-बुकिंगला सुरुवात झाली आहे.https://www.starlink.com/ या लिंकवर जाऊन तुम्ही प्री-बुकिंग करू शकता. स्टारलिंक इंटरनेटसाठी प्री-बुकिंग सध्या दिल्ली, मुंबई, काेलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये सुरुवात झाली आह