सागरी परिषदेत 55 हजार काेटींचे करार

    05-Mar-2021
Total Views |
मिरा-भाईंदर ते डाेंबिवलीदरम्यान जलमार्गाचा विकास
 
नवी दिल्ली, 4 मार्च (आ.प्र.) : पर्यटन, जलवाहतूक आणि व्यापाराला बळकटी आणणारे 55 हजार काेटींचे गुंतवणूक सामंजस्य करार ‘भारतीय सागरी परिषदे’च्या निमित्ताने राज्यातील बंदरांनी देश-विदेशातील गुंतवणूकदारांबराेबर केले आहेत.त्याचबराेबर मिरा-भाईंदर, काेलशेत, काल्हेर, डाेंबिवली असा जलमार्गाचा विकास आणि ठाणे, घाेडबंदर परिसरात तरंगते हाॅटेल (फ्लाेटेल) तयार केले जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. परिषदेत ‘महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी’ या विषयावरील सत्रात बाेलताना मुंबई पाेर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलाेटा यांनी राज्यातील बंदर आणि सागरी क्षेत्रात 55400 काेटींचे गुंतवणूक सामंजस्य करार झाल्याची माहिती दिली.राज्यातील बंदरांचा विकास, बंदरांना रस्ते आणि रेल्वे मार्गाशी जाेडणे, जलवाहतूक, समुद्री पर्यटन आणि मालवाहतूक या क्षेत्रांत गुंतवणूकदारांना माेठी संधी आहे, असेही जलाेटा यांनी सांगितले. राज्यातील वाॅटर टॅक्सी, क्रूझ टर्मिनल, जहाज दुरुस्ती, याॅटसाठी विशेष सुविधा (मरिना) आणि जेट्टी विकास आदींसाठी ही गुंतवणूक आली आहे.विजयदुर्ग बंदराच्या विकासासाठी स्वारस्य निविदा लवकरच काढली जाणार असल्याची माहिती परिषदेत बाेलताना म हाराष्ट्र मॅरिटाइम बाेर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. अमित सैनी यांनी दिली.प्रवासी जलवाहतुकीसाठी मिरा भाईंदर, काेलशेत, काल्हेर, डाेंबिवली असा जलम मार्ग विकसित केला जाणार आहे. राज्यात उद्याेग व्यवसायाला बंदरांनी जाेडण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्रे (सेझ) निर्माण केली जाणार असल्याची माहिती डाॅ. सैनी यांनी दिली. महाराष्ट्र मॅरिटाइम बाेर्ड या वर्षात राे-पॅक्स आणि प्रवासी वाहतुकीसाठी जेट्टी असे सागरमाला प्रकल्पांतर्गत 20 प्रकल्प पूर्ण करणार आहे.