ट्राेलनंतर अ‍ॅमेझाॅनने बदलला App Logo

    05-Mar-2021
Total Views |
 
x_1  H x W: 0 x
 
नवी दिल्ली, 4 मार्च (वि.प्र.) : आपल्या नवीन अ‍ॅप आयकाॅनच्या डिझाइनमध्ये दिग्गज ई-काॅमर्स कंपनी अ‍ॅमेझाॅनने बदल केला आहे. कंपनीने हा निर्णय आपल्या ग्राहकांकडून आलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया आणि नेटकऱ्यांकडून विराेध झाल्यानंतर घेतला.जर्मनीचा हुकूमशाह हिटलरच्या मिशीसाेबत अ‍ॅमेझाॅन अ‍ॅपच्या ‘लाेगाे’ची तुलना झाल्यामुळे कंपनीने लाेगाे बदलला आहे.जानेवारीमध्ये नवीन अ‍ॅप आयकाॅनची डिझाइन अ‍ॅमेझाॅनने सादर केली हाेती.