काेराेना प्रतिबंधक लसीकरणासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात 25 केंद्रे कार्यान्वित

    05-Mar-2021
Total Views |
ठाणे, 4 मार्च (आ.प्र.) : केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात 60 वर्षे पूर्ण केलेले वयाेवृद्ध नागरिक,फ्रंटलाईन वर्कर्स, विविध व्याधिग्रस्त नागरिक आणि ज्यांची नाेंदणी झालेली नाही, अशा आराेग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण माेहिमेस सुरुवात झाली आहे. काेराेना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या टप्प्यास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्ूर्त प्रतिसाद मिळत असून, लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात नवीन 9 लसीकरण केंद्रे वाढवण्यात आली असून, एकूण 25 ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. 45 ते 60 वर्षे वयाेगटातील जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापाैर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी केले आहे.महापालिकेच्या वतीने एकूण 15 ठिकाणी लसीकरणासाठी स्वतंत्र केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. या केंद्रावर हाेत असलेली नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन आणखी आराेग्य केंद्रे वाढवण्याचे आदेश महापाैरांनी आराेग्य विभागाला दिले हाेते. त्यानुसार ठाणे परिक्षेत्रात दादाेजी काेंडदेव स्टेडियमवरील आयुर्वेदिक हेल्थ सेंटर, ग्लाेबल काेविड हाॅस्पिटल, साकेत, कळवा आराेग्य केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, राेझा गार्डनिया आराेग्य केंद्र, घाेडबंदर राेड, किसननगर आराेग्य केंद्र, लाेकमान्यनगर आराेग्य केंद्र, पाेस्ट काेविड सेंटर, माजिवडा, वर्तकनगर आराेग्य केंद्र, शीळ आराेग्य केंद्र, काेपरी मॅटर्नी केंद्र, मानपाडा आराेग्य केंद्र, मनाेरमानगर आराेग्य केंद्र, गांधीनगर आराेग्य केंद्र आणि काैसा आराेग्य केंद्र कार्यान्वति करण्यात आल हाेते.