वाघाेबा बनले गायक

    04-Mar-2021
Total Views |
 
n_1  H x W: 0 x
 
बारनाेल, 3 मार्च (वि.प्र.) : चक्क वाघाेबा गायला लागले आहेत. विशेष म्हणजे या वाघाेबांच्या गाणे ऐकण्यासाठी लाेकांची माेठी गर्दी हाेऊ लागली आहे. हा वाघ सायबेरिया या देशातील बारनाेल येथील प्राणी संग्रहालयात आहे. या वाघाचे वय फक्त 8 महिने आहे. म्हणजे हा वाघ छावा आहे.विशेष म्हणजे हा वाघिणीचा बछडा चक्क गाताे. या वाघाचा आवाज इतका मधुर आहे की, या वाघाची डरकाळी नव्हे, तर त्याचा गाेड आवाज ऐकण्यासाठी लाेकांची प्रचंड गर्दी हाेत आहे.वाघाच्या या बछड्याच्या गाण्याला ‘कर्ण मंजुले आक्रंद’ असे नाव देण्यात आले आहे. या वाघाच्या बछड्याचे नाव विटास असून ताे संगीतप्रेमी लाेकांचा ‘लाडका वाघ’ बनला आहे. त्याचा आवाज इतका मधूर कसा येताे याची चिकित्सा तज्ज्ञांकडून केली जात आहे.