काेराेना राेखण्यासाठी राज्यात लसीकरणाला गती देणार : कुंट

    04-Mar-2021
Total Views |
 
f_1  H x W: 0 x
 
मुंबई, 3 मार्च (आ.प्र.) : राज्यात काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी उपाययाेजना यशस्वीरीत्या राबवतानाच लसीकरणाला गती देणे, अर्थव्यवस्थेला चालना देतानाच महत्त्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करून ते वेळेत पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी येथे सांगितले.नवनियुक्त मुख्य सचिव कुंटे यांनी मुख्य सचिव कार्यालयात पदभार घेतला. या वेळी मुख्य सचिवांचे उपसचिव उदय चाैधरी यांनी पुष्पगुच्छ देऊन कुंटे यांचे स्वागत केले. माजी मुख्य सचिव संजय कुमार या वेळी उपस्थित हाेते. काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या उपाययाेजना करण्यात येत आहेत, त्यांची प्रशासकीय यंत्रणेमार्फत यशस्वीरीत्या अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. नागरिकांनी काेराेना नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. राज्यात सुरू असलेल्या काेराेना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढवण्यात येणार आहे, असे कुंटे यांनी सांगितले.काेराेनामुळे अर्थव्यवस्थेला खीळ न बसता ती अधिक गतिमान हाेण्यासाठी प्रयत्न करतानाच राज्यात सुरु असलेले महत्त्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण हाेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही कुंटे यांनी सांगितले. दिवसभरात विविध विभागांचे सचिव, तसेच मान्यवरांनी कुंटे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.