देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य

    04-Mar-2021
Total Views |

sd_1  H x W: 0  
 
देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आपल्या महाराष्ट्रात आहे.सांगली जिल्ह्यात ते असून, त्याचे नाव आहे, यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य. या अभयारण्यास हरिणांचे माहेरघर म्हणून प्रसिद्धी मिळालेली आहे. या अभयारण्याचे क्षेत्रफळ 10.87 चाैरस किलाेमीटर इतके आहे. येथे राहण्यासाठी सुंदर अशा बांबूकुटी आहेत.लहान मुलांसाठी खेळण्याच्या सुविधा आहेत. येथे असलेले छाेटे छाेटे धबधबे, खूप सारे पक्षी आणि हरिणं ह्यामुळे ह्या अभयारण्यास अनेक लाेक भेटी देतात. येथे जवळपास 200 च्या वर चितळ आणि तितकेच सांबरदेखील आहेत. त्यामुळे हमखास तुम्ही ते तिथे पाहू शकता.भारतातील सर्वात लहान फुलपाखरू ज्याचे नाव आहे, ग्रास जुवेल तेदेखील येथे आहे. आपल्या राज्यात ताडाेबा, दाजीपूर, चांदाेली, काेयना, नागझिरा, मेळघाट, तानसा, नायगाव ही नैसर्गिक अभयारण्ये आहेत. त्यात आता सागरेश्वर या मानवनिर्मित अभयारण्याची भर पडली आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि वृक्षमित्र धाे.म. माेहिते यांच्या पुढाकारातून 1985 मध्ये हे अभयारण्य आकाराला आलेले आहे.पक्षिनिरीक्षणासाठी हे अतिशय उत्तम ठिकाण आहे.