शेतकऱ्यांना दिवसा, पुरेशी वीज देण्यास प्राथमिकता : मुख्यमंत्री

    04-Mar-2021
Total Views |
महाकृषी ऊर्जा अभियानाची अंमलबजावणी करा
 
f_1  H x W: 0 x
 
मुंबई, 3 मार्च (आ.प्र.) : शेतकऱ्यांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून, महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानभवनात करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री डाॅ.नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आदी उपस्थित हाेते. शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखासमाधानाचे क्षण कसे येतील, हे पाहणे सरकारचे काम आहे. घाेषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे आम्ही हाेऊ देणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न साेडवण्यास आमचे प्राधान्य असून, नीती आयाेगासाेबत झालेल्या बैठकीत पीक विम्याचा प्रश्न उपस्थित केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.ग्राहकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. वीजबिल थकलेल्या सर्व शेतकऱ्यांनी थकीत वीजबिलांवर सूट मिळवण्यासाठी नवीन कृषी वीज जाेडणी धाेरणांतर्गत जाहीर केलेल्या याेजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पवार यांनी केले. नवीन कृषिपंप वीजजाेडणी धाेरणात 18 हजार शेतकऱ्यांना वीजजाेडणी देण्यात आली आहे. तसेच 10 हजाराहून अधिक साैर कृषिपंप देण्यात आले आहेत, असे डाॅ.राऊत यांनी सांगितले.या वेळी कृषी ऊर्जा पर्वाबाबतचे संगणकीय सादरीकरण महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले. विजेची संपूर्ण थकबाकी भरुन थकबाकीमुक्त झालेले इगतपुरीचे शेतकरी कचरु धाेंडू बाेराडे यांना सन्मानपत्र, पालीचे शेतकरी राेशन रुईकर यांना साैर कृषिपंप हस्तांतरण पत्राचे वितरण, तर पालघरचे संजय पावडे यांना नवीन कृषिपंप वीजजाेडणी प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्याचे आले. कृषी ऊर्जा पर्व पाेस्टर आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शेतकरी कचरु बाेराडे यांनी थकबाकीची 91500 रुपयांची रक्कम एकरकमी भरल्यामुळे या याेजनेत त्यांना सुमारे 1 लाख 25 हजारांची सूट मिळाली, अशी माहिती या वेळी देण्यात आली.याप्रसंगी महाऊर्जाचे महासंचालक सुभाष डुंबरे, महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक डाॅ.नरेश गिते आदी उपस्थित हाेते.