मु्नत, दूरस्थ शिक्षण घेणाऱ्यांचे देश विकासात याेगदान : राज्यपाल

    04-Mar-2021
Total Views |
मुक्त विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ उत्साहात
 
t_1  H x W: 0 x
 
नाशिक, 3 मार्च (आ.प्र.) : काैटुंबिक जबाबदारी, शेती व व्यवसाय सांभाळून मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आत्मनिर्भर भारत निर्मितीत याेगदान सर्वाधिक असून, पारंपरिक विद्यापीठांतील विद्यार्थ्यांपेक्षा ते निश्चितच जास्त असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह काेश्यारी यांनी केले.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 26 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपतींच्या दूरस्थ उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बाेलत हाेते. दीक्षांत समाराेहात नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांना आभासी पद्धतीने पदवी प्रदान करण्यात आली.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने केंद्राच्या कृषि विज्ञान केंद्रांसाेबत काम करून शेतकऱ्यांना माहिती व याेग्य प्रशिक्षण देण्याची साेय केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.मुक्त विद्यापीठाने 191128 विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, व्हायवा व नियमित परीक्षा घेतल्या. तसेच, 6 लाख विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्रवाहाशी जाेडल्याची माहिती कुलगुरू डाॅ. ई. वायुनंदन यांनी दिली. दीक्षांत समाराेहात 25 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके व 81 बक्षिसे व 2019 व 2020 या दाेन वर्षांच्या मिळून 2,93,852 पदव्या प्रदान करण्यात आल्या.