परदेशी गायींच्या दुधामुळे महिला लठ्ठ; डीएमके नेत्याच्या विधानावर संताप व्यक्त

    30-Mar-2021
Total Views |

 क्ष्स,_1  H x
 
परदेशी गायींच्या दुधामुळे भारतीय महिला लठ्ठ झाल्या आहेत, असा जावईशाेध द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे (डीएमके) नेते दिंडीगुल आय लेओनी यांनी लावला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा महिला संघटनांनी चांगलाच समाचार घेतला असून अनेकांकडून त्यांच्यावर टीका हाेत आहे.लेओनी यांनी काेईमतूर येथे करीत असलेल्या निवडणूक प्रचारादरम्यान हे वक्तव्य केले. भारतीय महिलांनी आपली चांगली शरीरयष्टी गमावली आहे.परदेशी गायींचे दूध पिऊन त्या लठ्ठ झाल्या आहेत, असे विधान त्यांनी केले. दुर्दैवाने तेथे उपस्थित असलेल्या जनसमुदायातील काहींनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून या वक्तव्याची मजा लुटली. या सर्व घटनेचा व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाल्यावर समाजातील सर्व थरांमधून लेओनी यांच्यावर टीका हाेऊ लागली आहे.गायींचे प्रकार अनेक असतात, हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला अनेक परदेशी गायीही दिसतात. परदेशी गायींचे दूध घेण्यासाठी लाेक दुधाच्या यंत्राचा वापर करतात. यंत्र सुरू झाल्यावर केवळ तासाभरात 40 लिटर दूध मिळते. हे दूध पिऊन आपल्या स्त्रिया फुग्यासारख्या फुगल्या आहेत. पूर्वी स्त्रियांची शरीरयष्टी 8 या आकड्यासारखी दिसत असे. पण आता जर त्यांनी मुलाला धरले, तर ते घसरून पडते. कारण आता त्या बॅरल बनल्या आहेत. आपली मुलेही लठ्ठ झाली आहेत, असे संतापजनक विधान लेओनी यांनी प्रचारादरम्यान केले.लेओनी हे बाेलत असताना पक्षाचा एक कार्यकर्ता त्यांच्या हातात तांदूळ देत हाेता आणि या तांदळाच्या निकृष्ट दर्जावर भाष्य करावे, असे ताे सुचवत हाेता.तेव्हा त्यांनी एक मिनीट त्या तांदळावर भाष्य केले आणि ते पुन्हा महिलांच्या विषयावरच घसरले.दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरले आहे. पक्षाच्या नेत्या कनिमाेळी यांनी लेओनी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.