वेळेच्या व्यवस्थापनाने हाेईल कार्यक्षमतेत वाढ

    03-Mar-2021
Total Views |
 
z_1  H x W: 0 x
 
काेविड-19 मुळे आपल्या जगण्यामध्ये बराच बदल झाला आहे. पण वेळेचा उपयाेग करून घेतला, तर आपल्या उत्पादनक्षमतेत वाढ हाेते आणि कामाचा व आयुष्याचा समताेलही साधला जाताे. बऱ्याचदा कामे अनेक असतात, खूप काही करण्याची इच्छा असते. पण करण्यासाठी वेळच नसताे. त्यासाठी आवश्यकता असते, ती वेळेच्या व्यवस्थापनाची. गेला फेब्रुवारी महिना हा ‘टाइम मॅनेजमेंट’ महिना म्हणून साजरा करण्यात आला.या निमित्ताने वेळेचे व्यवस्थापन या विषयावर बरीच चर्चा झाली. या चर्चेतून काही गाेष्टी समाेर आल्या.अतिआश्वासने नकाेत : आपल्या राेजच्या आयुष्यात नवनव्या संधी येत असतात. त्यामुळे आधीपासूनच उगीच जास्तीची आश्वासने देत बसू नये आणि स्वतःला फार ताणूही नये. असे केल्याने तुम्ही खूप कामे मागे लावून घ्याल आणि मग काेणतेही काम नीटपणे हाेऊ शकणार नाही. तुमच्या कामांचे व्यवस्थित नियाेजन करा. त्यामुळे तुमच्यावरचा ताण कमी हाेईल आणि तुम्ही तुमची सगळी कामे नीटपणे करू शकाल.प्राधान्यक्रम ठरवा : बाेलणे साेपे असते आणि करणे अवघड. पण तुम्ही तुमच्या कामाचे नियाेजन कराल, तेव्हा सर्वप्रथम प्राधान्यक्रम ठरवा. काेणत्या कामांना काेणती मुदत आहे, काेणती कामे कधी करायची आहेत, याची माहिती घ्या. त्यानुसार क्रमवारी तयार करा.त्यामुळे तुमच्यावरील ताण कमी हाेईल आणि उत्पादकता वाढेल. कामाचे नियाेजन करताना कॅलेंडर समाेर ठेवा, काॅम्प्युटरवर कामांची यादी करा, कामाची आठवण ठेवण्यासाठी फाेन किंवा नाेटपॅडचा वापर करा. अशा छाेट्या छाेट्या गाेष्टी तुम्हाला खूप उपयाेगी ठरतील.कामाचे महत्त्व आणि वेळेची मुदत यांची सांगड घालून कामे केलीत, तर ती अधिक चांगल्या पद्धतीने, त्रास न हाेता, केली जातील.तंत्रज्ञानाचा वापर करा : ‘टाइम ट्रॅकिंग साॅफ्टवेअर’ हा एक चांगला पर्याय आहे. म्हणजे तुम्ही किती काम करता, याच्यावर देखरेख ठेवायची. म्हणजे समजा तुमच्या कामाचे आठ तास असले, तरी एका संशाेधनानुसार या आठ तासांतील केवळ दाेन तास 53 मिनिटे ही उत्पादकतेची असतात. काम करत असताना 45 ते 60 मिनिटांनी 10 ते 15 मिनिटांचा ब्रेक घेण्याने तुमची उत्पादकता वाढू शकते. ब्रेक केव्हा घ्यायचा, याची आठवण करण्यासाठी ‘डेस्कटाइम’ हे अ‍ॅप तुमची मदत करू शकते. सतत काॅम्प्युटरवर काम केल्याने डाेळ्यावर आलेला ताणही ब्रेक घेतल्याने कमी हाेताे आणि उत्पादकता वाढते.तुम्ही ‘वर्क फ्राॅम हाेम’ करीत असा किंवा ऑफिसमध्ये, तुम्हाला या टिप्स खूप उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढू शकते.