एक डुलकी घ्या आणि पुन्हा कामाला लागा

    03-Mar-2021
Total Views |
 
c_1  H x W: 0 x
 
काम करताना बसल्या जागी डुल्नया घेण्याची सवय अनेकांना असते. त्याशिवाय त्यांना कामच सुचत नाही.अशावेळी ही छाेटीशी डुलकी घेणे चांगली असते. तुमचा मेंदू या लहानशा डुलकीमुळे रिचार्ज हाेताे. डुलकी घेतल्यामुळे तुम्हाला ताजंतवानं वाटतं, व त्यानंतर तुम्हाला दुसरं काम करण्यासाठी उत्साह येताे. या डुलकीमुळे मेंदू आधीपेक्षा जास्त टवटवीत हाेऊन अधिक क्रियाशील हाेताे. निद्रातज्ज्ञ याला पाॅवर नॅप असं म्हणतात. त्यांच्या मते अशी डुलकी घेण्याचे चार प्रकार आहेत.10 ते 20 मिनिटे घेतलेली झाेप तुम्हाला तत्पर राहण्यासाठी मदत करते. ती गाढ झाेप नसते; पण त्यामुळे प्रसन्न वाटतं.अर्ध्या तासाची झाेपही क्रियाशीलता वाढवण्यासाठी चांगले असते. मात्र, या झाेपेनंतर पुन्हा अर्धा तास डाेळ्यांवर झाेप रेंगाळत राहते.एका तासाभराची डुलकी छाट्या डुलकीपेक्षा चांगली असते.या झाेपेमुळे स्मृतीविषयक बाैद्धिक क्षमता वाढीस लागते. दीड तासाची झाेप सर्वांत चांगली, असे निद्रातज्ज्ञ सांगतात. कारण या काळात झाेपेच्या सर्व अवस्था आणि क्रिया पूर्ण हाेतात.सुरुवातीला वरवर झाेप लागून अशी झाेप घेताना माणूस गाढ झाेपेत जाताे. त्यात त्याला स्वप्नंही पडतात. ही निद्रा भावनिक स्मृतीशी आणि शिकण्याच्या प्रक्रियेशी निगडित असते.लहानशी झाेप घेताना थाेडं बसल्यासारखं झाेपावं म्हणजे गाढ झाेप लागणार नाही.