साेशल मीडियासाठी नियमावली लागू हाेणार

    03-Mar-2021
Total Views |
 
द/_1  H x W: 0
 
नवी दिल्ली, 2 मार्च (वि.प्र.) : साेशल मीडियावर प्रभावशाली व आकर्षक पाेस्ट टाकून एखाद्या उत्पादनाची वारेमाप जाहिरात करणे आता साेपे राहणार नाही. कारण अ‍ॅडव्हरटायझिंग स्टँडर्ड काैन्सिल ऑफ इंडिया या बाबतीत पारदर्शकता आणण्यासाठी लवकरच रेग्युलेशन (नियमावली) जारी करण्यात येणार आहेत.या रेग्युलेशनच्या मसुद्यानुसार साेशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला हेही सुनिश्चित करावे लागेल की, एखाद्या ब्रांडचे डिजिटल प्रमाेशनल कंटेंट वाढवून दाखविण्यासाठी काेणताही फिल्टर वापरलेला नसावा. तसेच इन्फ्लुएन्सर्सला हेही निश्चित करावे लागेल की, ब्रांडच्या वतीने करण्यात आलेले काेणतेही टे्निनकल अथवा प्रदर्शन याच्याशी संबंधित दाव्यांची पुष्टी करण्यात आलेली आहे.एएससीआय डिजिटल प्लॅटफाॅर्मवर जाहिरात म्हणून दिशानिर्देशासाठी तयार केलेल्या मसुद्याला मार्च 2021 अखेर अंतिम स्वरूप देण्याची शक्यता आहे.त्यापूर्वी या संदर्भात जनतेकडून मतेही मागविण्यात येणार आहेत. या मसुद्यात असे नमूद करण्यात आले आहे की, अ‍ॅडव्हर्टायझिंग कन्टेटचे डिस्क्लोजर लेबल प्रदर्शित करावे लागतील व असा उल्लेख कंटेन्टवरच असावा की, सर्व उपकरणे स्पष्ट दिसतील. डिस्क्लोजर लेबल्स एखाद्या प्लॅटफार्मवर टाकलेले कन्टेट पहिल्या दाेन ओळीत स्पष्ट करायला हवे. एडिटाेरियल आणि इंडिपेन्डन्ट युजरच्या वतीने तयार केलेले अ‍ॅडव्हरटायझिंग कन्टेंन्टचे प्रदर्शन अशा पद्धतीने व्हावे की, ती वारेमाप आश्वासने ठरू नयेत व गिऱ्हाईकांना सहज समजतील की ते सामान्य नसून प्रमाेशनल कन्टेंन्ट आहे व यानुसारच एक डिस्क्लोजर लेबल अवश्य असले पाहिजे. याची निवड अ‍ॅप्रुव्हड यादीतून करावी लागेल. एएसआयचे अपु्रव्हड लेबल्समध्ये अ‍ॅड. काे-लॅब, प्राेमाे, स्पाॅन्सर्ड अथवा पार्टनरशिपचा समावेश आहे. साेशल मीडियावर जाहिरात करताना याचे पालन करावे लागेल.जेणेकरून युजर कन्फ्युज्ड हाेणार नाहीत.सध्या भारतीय एन्फ्लुएन्सर्स मार्केट वार्षिक 543-1,087 काेटी रु. आहे.