कुंडीत आनंदाचं झाड, कसं लावाल?

    03-Mar-2021
Total Views |
 
cd_1  H x W: 0
 
बालमित्रांनाे, सध्या काेराेनाकाळात लाॅकडाऊनमुळे तुमची ऑनलाइन शाळा सुरू आहे. त्यामुळे शाळेत जाण्या-येण्याचा वेळ वाचत असणार, दिवसरात्र अभ्यास करून आणि खेळून कंटाळा येत असेल तर एक नवीन काम करा, छान नवी राेपटी तुम्ही लावू शकता, तुमच्या आवडीचं राेपटं पालकांना आणायला सांगा किंवा एखाद्या झाडाची कलम सुद्धा लावू शकता.जे झाड तुम्ही लावणार आहात ते कुंडीच्या मधाेमध ठेवून राहिलेली कुंडी मातीने भरा.माती भरताना झाडांच्या मुळात पाेकळी राहणार नाही, अशा पद्धतीने भरावी. त्यासाठी माती हाताने नीट दाबून घ्या. पुरेसे पाणी राहण्यासाठी कुंडीचा दाेन इंच भाग रिकामा साेडा. झाड लावल्यावर लगेच पाणी द्या. राेज त्याला आवश्यक तेवढे पाणी घाला, त्याची काळजी घ्या.कुंडी जिथे ठेवाल तिथे ऊन असेल, याची काळजी घ्या. कुंडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवायची असल्यास ती काठाला धरून न उचलता मध्ये धरून उचला. कुंडीमध्ये झाडाच्या चारही बाजूने पाणी द्यावे.कुंडीमधून आलेले मातीचे पाणी बाहेर सांडून घरातील फरशी खराब हाेऊ नये, कुंडीच्या खाली प्लॅस्टिकची किंवा धातूची जुनी ताटली ठेवा. त्या झाडाची वाढ हाेताना बघताना तुम्हाला आनंदच हाेईल. तुम्हाला आनंद देणारं झाड म्हणून ते आनंदाचं झाड.