मु्नत व संस्कृत विद्यापीठाचे पुण्यात विभागीय केंद्र हाेणार

    26-Mar-2021
Total Views |
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
 
r_1  H x W: 0 x
 
मुंबई, 25 मार्च (आ.प्र.) : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक-नागपूर या विद्यापीठाचे उपकेंद्र बालेवाडी-पुणे येथे, तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र पुण्यात, तर उपकेंद्र बारामतीत सुरू करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, अपर मुख्य सचिव (नियाेजन) देबाशिष चक्रवर्ती, अपर मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख (व्हीसीद्वारे), संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडीकर, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई.वायुनंदन आदींसह संबंधित विद्यापीठांचे अधिकारी उपस्थित हाेते.संस्कृत विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. पुण्यात या विश्वविद्यालयाचे उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या उपकेंद्रात संस्कृतसह, इंडाॅलाॅजी, संस्कृत भाषांतर आधुनिक शिक्षणाचा अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे. या उपकेंद्रासाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.कुलगुरूंनी या उपकेंद्रासाठी आवश्यक बाबींची माहिती तातडीने देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र बालेवाडीत करण्यात येणार आहे. या केंद्राचा उपयाेग एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना हाेणार आहे. बारामतीत मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या उपकेंद्रासाठी शासनाची जागा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या.बारामतीत मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबराेबरच अद्ययावत ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. या ग्रंथालयाचा लाभही विद्यार्थ्यांना हाेणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.