काेराेना चाचणीनंतरच आता माॅलमध्ये प्रवेश

    26-Mar-2021
Total Views |
 
b_1  H x W: 0 x
 
नवी मुंबई, 25 मार्च (आ.प्र.) : नवी मुंबईतील काेराेना परिस्थिती गंभीर झाल्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नवे निर्बंध लागू केले आहेत.यात शहरातील माॅलमध्ये हाेत असलेली गर्दी पाहता शुक्रवार ते रविवार तीन दिवस अभ्यागतांची काेराेना चाचणी केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे.शहरातील उद्यानेही आता सकाळी 5.30 ते 10 पर्यंतच खुली ठेवण्यात येणार आहेत. नवी मुंबईत रुग्णदुप्पटीचा वेग दाेन वर्षांवरून चार महिन्यांवर खाली आला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या अडीच हजारांपर्यंत झाली आहे. त्यामुळे पालिकेने नवे निर्बंध लागू केले आहेत. माॅल, डिपार्टमेंटल स्टाेअर्स, उद्याने, बाजारांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. शहरातील सर्व उद्याने सकाळी 5.30 ते 10 पर्यंतच खुली राहणार आहेत. इतर वेळांत सर्व उद्याने सकाळी 10 नंतर बंद करण्यात येणार आहेत. माॅलमध्ये शुक्रवारी संध्याकाळी 4 नंतर रविवारी रात्रीपर्यंत अभ्यागतांची काेराेना चाचणी करण्यात येणार असून, अहवाल निगेटिव्ह असल्यास प्रवेश दिला जाणार आहे. माॅलच्या प्रवेशद्वारावरच प्रत्येक व्यक्तीची अँटिजेन चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. तसेच, अभ्यागताला मागील 72 तासांमधील ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल नकारात्मक असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय माॅलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, गर्दी झाल्याचे आढळल्यास प्रत्येक वेळी रुपये 50 हजार इतका दंड माॅल व्यवस्थापनाकडून आकारण्यात येणार आहे.